मुंबई : हल्लीच्या दिवसांमध्ये स्मार्टफोनचा वापर इतका वाढला आहे, की एक क्षणही या उपकरणापासून दूर राहणं अनेकांना शक्य होत नाही. स्मार्टफोन हातात आला, की अनेक कामं सोपी करणारे ढिगभर अॅप इन्स्टॉल करण्याचा घाट घातला जातो. गाणी ऐकण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठीच्या प्लेलिस्ट तयार केल्य़ा जातात. (Smarthphone Hang)
फोनवर या साऱ्याचा मारा होत असताना, अरे बक्कळ मेमरी आहे..... असं मोठ्या गर्वाने म्हटलंही जातं. पण, जेव्हा हाच स्मार्टफोन हँग होऊ लागतो, तेव्हा मात्र धाबे दणाणू लागतात.
फोनवर काम सुरु असताना तो हँग होताच कपाळावर हात मारण्यापेक्षा ही 3 कामं करा... बघा तुमचा फोनही कसा अगदी सुस्साट चालतो ते.
डीप क्लिनिंग
स्मार्टफोन हँग होण्यामागचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे त्यात होणारी स्टोरेजची कमतरता. यावर उपाय म्हणजे डीप क्लिनिंग. अर्थात स्मार्टफोनमधून नको असणारा डेटा डिलीट करणं.
गरज नसतानाही डाऊनलोड झालेल्या असंख्य फाईल्य डिलीट केल्याचा स्मार्टफोनला मोठा फायदा होतो.
या फाईल्स न विसरता डिलीच करा
स्मार्टफोनमधून ड्युप्लीकेट फाईल्स डिलीट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या अशा फाईल्स आहेत त्या कळत नकळत तुम्ही एकाहून अधिक वेळेस डाऊनलोड केल्या आहेत.
कॅश (Cache) क्लिअर करणं
आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये अशाही फाईल्स किंवा माहिती असते जिला कॅश, कॅशे अशा नावांनी संबोधलं जातं. या अशा फाईल्स किंवा ही अशी माहिती असते जिचा वापर होत नसतो.
सातत्यानं या फाईल्स डिलीट करण्याचा इथं फार फायदा होतो. मुख्य म्हणजे यासाठी तुम्ही काही अधिकृत क्लिनर अॅपचा वापरही करु शकता.