सुजुकी जिक्सरचं ABS व्हेरिएंट लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत

बाईकप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. सुजुकी कंपनीने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय बाईक जिक्सरचं नवं एबीएस व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. ABS म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम असलेल्या या बाईकची बाईकप्रेमी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते.

Updated: May 28, 2018, 06:12 PM IST
सुजुकी जिक्सरचं ABS व्हेरिएंट लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत title=

नवी दिल्ली : बाईकप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. सुजुकी कंपनीने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय बाईक जिक्सरचं नवं एबीएस व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. ABS म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम असलेल्या या बाईकची बाईकप्रेमी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते.

सुजुकी जिक्सरमध्ये सिंगल चॅनल एबीएस आहे आणि हे केवळ रियर डिस्क ब्रेक मॉडलसह उपलब्ध आहे. नवी सुजुकी जिक्सर ABS तीन ड्युअल कलर्समध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये मेटॅलिक ट्राइटन ब्लू / ग्लास स्पार्कल ब्लॅक, कँडी सोनोमा रेड / मेटॅलिक सोनिक सिल्व्हर आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. 

जिक्सर बाईकमध्ये एबीएस फिचर आल्याने आता यापुढे सुजुकीच्या सर्वच 150 cc बाईक्समध्ये हे सेफ्टी फिचर पहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एबीएस फिचर व्यतिरिक्त बाईकमध्ये इतर कुठलाही बदल केला नसल्याचं दिसत आहे.

जिक्सरच्या या मॉडलमध्ये 155 CC, एअर कुल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 8,000 आरपीएमवर 14.8 हॉर्सपॉवर आणि 6,000 आरपीएमवर 14 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. सुजुकी जिक्सर एबीएसची स्पर्धा भारतीय बाजारपेठेत असलेल्या होंडा सीबी Hornet 160R, यामाहा FZ-S Fi, बजाज पल्सर NS160 आणि टीव्हीएस Apache RTR 160 4V बाईक्स सोबत होणार आहे.

बाईकची किंमत :

नवी दिल्लीत जिक्सरच्या नव्या एबीएस व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत काय आहे यावर एक नजर टाकूयात...

रियर ड्रम व्हेरिएंट : 77,015 रुपये 

रियर डिस्क व्हेरिएंट : 80,929 रुपये 

एबीएस व्हेरिएंट : 87,250 रुपये