'हा' Earbuds मिळतोय सर्वांत स्वस्त, ग्राहकांची खरेदीसाठी उसळलीय गर्दी

खरंचं इतका स्वस्त मिळतोय 'हा' Earbuds,किंमत एकूण लगेच खरेदी करालं

Updated: Aug 30, 2022, 09:29 PM IST
'हा' Earbuds मिळतोय सर्वांत स्वस्त, ग्राहकांची खरेदीसाठी उसळलीय गर्दी  title=

मुंबई : हेडफोन्सचा जमाना गेला आता सर्व इयरबर्डस वापरतात.ट्रेनमध्ये, रस्त्यावर आणि फोनवर बोलताना आजकल अनेकजण  इअरबड्सच घातलेले दिसतात. त्यामुळे अनेकांचा ओढा आता इअरबड्स खरेदीकडे असतो. मात्र काही इयरबर्ड्स हे खुपच महाग असल्याने ग्राहक खरेदी करत नाहीत. मात्र हा इयरबर्ड्सच तुमच्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे या इअरबड्सची किंमत पाहता क्षणी तुम्ही खरेदी कराल. त्यामुळे हा इअरबड्स नेमका आहे कोणता ते जाणून घेऊयात. 

इअरबड्स खरेदी करायला प्रत्येकाला आवडेल, मात्र अनेक जण बजेटमधलं इयरबर्ड्स शोधत असतात. तसेच बजेटचा प्रश्न विचारल्यावर अनेकांना एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे इअरबड्स हवे असतात. या किमतीत इअरबड्स उपलब्ध आहेत, पण दर्जा कसा असेल याबद्दल काहीही सांगता येत नाही. मात्र आता बजेटमधला एक इअरबड्स समोर आला आहे. हा इअरबड्स खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतायत. 

फिचर्स 
 Swott Airlit005 earbuds हा एक उत्कृष्ट  इअरबड्स आहे.1 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत हा इअरबड्स येत असल्याने ग्राहकांमध्ये याबाबतची उत्सुकता वाढलीय.  तुम्ही या इअरबड्सचा बॉक्स उघडताच दोन्ही दिवे पेटतील. यासह या लाइट्सवरून तुम्हाला चार्जिंग टक्केवारीची कल्पना येईल. बॉक्समध्ये  तुम्हाला चार्जिंग केबल आणि काही अतिरिक्त रबर कॅप्स मिळतील. डिझाइनच्या बाबतीत विशेष काही नाही. 

विशेष म्हणजे बॉक्समधून बाहेर काढताच फोनशी कनेक्ट होतो. यामध्ये तुम्हाला टच कंट्रोल देखील मिळतो. चांगली गोष्ट अशी आहे की स्पर्श फारसा संवेदनशील नसतो आणि कुठेही स्पर्श केल्यावर काम करत नाही.

तुम्हाला दोन्ही इयरबड्सवर कंट्रोल टच बटणे मिळतील. या बटणांसह, तुम्ही कॉल उचलू शकता, कॉल कट करू शकता आणि तुम्ही नंबर पुन्हा डायल देखील करू शकता. तुम्ही म्युझिक प्लेअर देखील नियंत्रित करू शकता. गाणी वाजवण्यापासून ते पुढील ट्रॅकपर्यंत वाजवता येतात. 

बॅटरी किती?
एका चार्जमध्ये हा इअरबड्स 20 तास चालू शकतो. हा इअरबड्स पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एका तासापेक्षा कमी वेळ लागतो. बॅटरी लेव्हलसाठी, तुम्हाला त्याच्या केसमध्ये दिवे दिले गेले आहेत. या लाइट्समुळे तुम्हाला चार्जिंगची कल्पना येईल.

किंमत किती?
जर तुम्हाला स्वस्त इयरबड्स हवे असतील तर तुम्ही Swott Airlit005 खरेदी करू शकता. हे इयरबड्स ऑनलाइन मार्केट प्लेसवर 799 रुपयांना उपलब्ध आहेत. त्यामुळे इयरबड्स खरेदीचा हा चांगला पर्याय आहे.