गरीबांचे स्वप्न पूर्ण होणार, टाटाची नवीन गाडी लॉन्च! किंमत फक्त...

कार खरेदी करण्याचा विचार करताय. तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.  टाटा कंपनीने नवी  TATA Nano EV कार लॉन्च केली आहे. या कारची किंमत किती? वाचा सविस्तर 

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 27, 2024, 05:02 PM IST
गरीबांचे स्वप्न पूर्ण होणार, टाटाची नवीन गाडी लॉन्च! किंमत फक्त...

Tata Mini Nano EV car : चारचाकी वाहनांच्या वाढत्या किंमती बघता टाटा लवकरच एक मिनी नॅनो लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. वाहनांची मागणी आणि किंमती बघता टाटा कमी किंमतीत आणखी एक मिनी नॅनो EV कार बाजारात आणणार आहेत. या कारची किंमत आणि फीचर्सच्या बाबतीत ग्राहकांसाठी सर्वोत्तम असेल. त्यामुळे जर तुम्ही 2024 मध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टाटाची मिनी नॅनो EV ही कार सर्वोत्तम पर्याय असू शकतो. 

Add Zee News as a Preferred Source

टाटा मिनी नॅनो कारची वैशिष्ट्ये 

या कारच्या वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी टाटा कंपनीने टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्टुमेंट क्लस्टर, मोबाईल कनेक्टिव्हिटी सिस्टम, ब्लूटूथ, चार्जिंग सपोर्ट, एबीएस, कनेक्टिव्हिटी सिस्टम आणि इतर वैशिष्ट्ये या कारमध्ये सामाविष्ट असणार आहेत. 

मिनी नॅनो कारचे इंजिन

टाटा कंपनीची मिनी नॅनो EV कार सीएनजी व्हेरियंट तसेच पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. टाटाची ही कार 1.2 लीटर इंजिनसह सीएनजी व्हेरियंटमध्ये दिसणार आहे. टाटाच्या इतर कार प्रमाणे टाटाची ही मिनी नॅनो कार मायलेजच्या बाबतीतही खूप चांगली असणार आहे. ही कार 30 किलोमीटरचा मायलेज देईल असं सांगितले जात आहे. 

या कारची किंमत किती? 

टाटा कंपनीची मिनी नॅनो कार ही किमतीच्या बाबतीतही खूपच स्वस्त असणार आहे. 2024 च्या इतर SUV सेगमेंटच्या वाहनांच्या तुलनेत CNG प्रकारात सर्वोत्कृष्ट असणार आहे. टाटा मिनी नॅनो SUV कारची भारतीय बाजारपेठेत 3 लाख रुपये एक्स-शोरुमच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केली जाऊ शकते. तर यामधील टॉप व्हेरिएंट कारची किंमत 5 लाख रुपये असू शकते. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More