Tata धमाका करण्याच्या तयारीत, 3 जबरदस्त Electric Car होणार लाँच

Tata Electric Cars: टाटा मोटर्सने आगामी एक वर्षात तीन नव्या इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच करण्याची तयारी केली आहे. यामध्ये एक टाटाची कन्सेप्ट कार आहे, जी ऑटो एक्स्पो 2023 दरम्यान प्रदर्शित करण्यात आली होती.   

शिवराज यादव | Updated: Aug 24, 2023, 02:34 PM IST
Tata धमाका करण्याच्या तयारीत, 3 जबरदस्त Electric Car होणार लाँच title=

Tata Electric Cars: देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक चारचाकींची विक्री करणाऱ्या टाटा मोटर्सने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करण्याची तयारी केली आहे. टियागो ईव्ही (Tiago EV) आणि नेक्सॉन ईव्हीच्या (Nexon EV) यशानंतर आता टाटा मोटर्स 3 नव्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जबदरस्त संधी आहे. कारण टाटाच्या या तिन्ही नव्या इलेक्ट्रिक कार जबरदस्त रेंज, तंत्रज्ञान आणि फिचर्ससह मार्केटमध्ये दाखल होत आहे. यामध्ये दोन गाड्यांना सेफ्टी रेटिंगमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. 

टाटा मोटर्स ज्या तीन कार लाँच करणार आहेत त्यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट (Nexon EV Facelift), टाटा पंच ईव्ही (Tata Punch EV) आणि टाटा कर्व ईव्ही (Tata Curvv EV) यांचा समावेश आहे. लोकांच्या गरजेनुसार ही कार डिझाईन करण्यात आली आहे. तसंच भविष्यातील गरज लक्षात घेता त्याप्रमाणे डिझाईन केलं आहे. 

Nexon EV Facelift: 

इलेक्ट्रिक कारमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या यादीत टाटाच्या नेक्सॉनचा समावेश आहे. दरम्यान, टाटा मोटर्स या कारच्या फेसलिफ्ट मॉडेलला याचवर्षी लाँच करण्याची शक्यता आहे. सध्या नेक्सॉनच्या आयसीई मॉडेलच्या फेसलिफ्टला सप्टेंबर महिन्यात लाँच केलं जाऊ शकतं. यानंतर नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्टला आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या कारच्या डिझाईनमध्ये अनेक बदल केले आहेत. या कारला टाटा कर्व ईव्हीच्या आधारे तयार केलं जात आहे. 

दरम्यान नव्या नेक्सॉन ईव्हीचं इंटिरियर तुम्हाला पूर्णपणे बदललेलं दिसणार आहे. मात्र कारच्या बॅटरी पॅक आणि मोटरमध्ये जास्त बदल करण्यात आलेले नाहीत. पण नव्या इलेक्ट्रिक कारची रेंज आधीच्या तुलनेत जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. 

Tata Punch EV: 

मायक्रो एसयुव्ही सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या टाटा पंचचं इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. रस्त्यावर चाचणी करताना अनेकदा ही कार दिसली आहे. याचं प्रो़डक्शन मॉडेल जवळपास तयार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार लाँच केली जाऊ शकते. 

आतापर्यंत पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जनमध्ये असणाऱ्या टाटा पंचचं इलेक्ट्रिक व्हर्जन पूर्णपणे वेगळं असणार आहे. या कारला टियागो ईव्हीपेक्षाही चांगल्या तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. ALFA प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली ही पहिली कार असणार आहे. या कारमध्ये रेंजवर खास लक्ष देण्यात आलं आहे. 

Tata Curvv: 

ऑटो एक्सपोदरम्यान टाटाने एका जबरदस्त डिझाईन कारला सादर केलं होतं. या कारला कर्व्ह असं नाव देण्यात आलं आहे. त्यावेळी ही फक्त कन्सेप्ट कार म्हणून सादर करण्यात आली होती. पण आता माहिती मिळत आहे की, 2024 पर्यंत कंपनी कर्व्हचा आयसीई आणि ईव्ही मॉडेलला देशभरात लाँच करु शकते. ही कंपनीची प्रीमियम सेगमेंट कार असेल आणि आतापर्यंत दाखल झालेल्या गाड्यांच्या तुलनेत अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल.