Xiaomi चा सर्वात स्वस्त Redmi मोबाईल लाँच; किंमत इतकी कमी की आवरणार नाही मोह

Xiaomi Redmi A2+ Price: शाओमीने आपल्या बजेट सेगमेंटमधील स्वस्त मोबाईलचा नवा व्हेरियंट बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनची किंमत 9 हजारांपेक्षा कमी आहे. या मोबाईलमध्ये कंपनीने ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 24, 2023, 12:32 PM IST
Xiaomi चा सर्वात स्वस्त Redmi मोबाईल लाँच; किंमत इतकी कमी की आवरणार नाही मोह title=

Xiaomi ला मिळणारा प्रतिसाद आता भारतीय बाजारपेठेत कमी होताना दिसत आहे. Xiaomi मोबाईल विक्रीत सतत घट होताना दिसत असून, कंपनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच कंपनीन आता आपल्या बजेट सेगमेंटकडे नव्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शाओमीने Redmi A सीरिजला लाँच केलं आहे. या सीरीजममध्ये सर्व बजेट स्मार्टफोन आहेत. ब्रँडने यावर्षी मार्च महिन्यात Redmi A2 आणि Redmi A2+ ला लाँच केलं होतं. 

कंपनीने आता Redmi A2+ चं नवं व्हेरियंट लाँच केलं आहे. या फोनची किंमत 9 हजारांपेक्षाही कमी आहे. या फोनमध्ये ग्राहकांनी स्टायलिश डिझाईनसह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती. 

किंमत किती?

Redmi A2+ आधीपासूनच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. आता कंपनीने त्याचं नवं व्हेरियंट बाजारात आणलं आहे. यामध्ये 4GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. नव्या व्हेरियंटची किंमत 8 हजार 499 रुपये आहे. हा मोबाईल तुम्ही अॅमेझॉन आणि शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करु शकता. हा मोबाईल लेदरसारख्या टेक्स्चर डिझाईनसह येतो. 

कंपनीने याआधी 4GB RAM आणि 64 GB स्टोरोजसह मोबाईल लाँच केला होता. त्यावेळी मोबाईलची किंमत 8499 ठेवण्यात आली होती. पण नंतर ब्रँडने याची किंमत कमी करुन 7999 रुपये केली होती. 

फिचर्स काय आहेत?

Redmi A2+ तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एक्वा ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि सी ग्रीन असे तीन पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 6.52-इंचाच्या IPS LCD स्क्रीनसह येतो, जो HD+ रिझोल्यूशनचा आहे. यामध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच उपलब्ध आहे. स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. 

यामध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा पर्याय आहे. या फोनवर तुम्ही मल्टीटास्किंग देखील करू शकता. यात 8MP मुख्य लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा आहे. 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 5000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्टसह येतो.