अचानक मोबाईलमध्ये LTE किंवा VoLTE का दिसतं? त्याचा अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाच नाही

What is LTE and VoLTE: तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अनेकदा LTE लिहिलेलं दिसतं. तर कधीतरी VoLTE अशी अक्षरं दिसतात. या दोघांमध्ये फरक आहे का? असेल तर कोणता आणि कसा?

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 28, 2023, 03:27 PM IST
अचानक मोबाईलमध्ये LTE किंवा VoLTE का दिसतं? त्याचा अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाच नाही title=
तुम्ही अनेकदा या दोन गोष्टी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाहिल्या असतील

What is LTE and VoLTE: आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या रोज नजरेस पडतात. मात्र दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या आपल्या नजरेमध्ये अगदी विचार करण्याइतक्या महत्त्वाच्या म्हणून येत नाही. त्यामुळेच अनेकदा साध्या साध्या रोजच्या वापरातील गोष्टींबद्दल विचारल्यास आपण बुचकाळ्यात पडतो. हे प्रश्न तसे दैनंदिन वापरातील वस्तूंबद्दल असले तरी त्यावर विचार होईलच असं नसतं. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत.

अगदी मोजक्या लोकांनाच असते कल्पना

आजच्या स्मार्ट जगामध्ये स्मार्टफोन ही काळाची गरज झाली आहे. आज जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन असतात. काही लोकांकडे तर एकाहून अधिक स्मार्टफोन असतात. याच स्मार्टफोनमधील इंटरनेटच्या सेवेमुळे आपण जगभरातील कोट्यवधी लोकांशी एकाच वेळेस जोडले गेलेले असतात. आपण स्मार्टफोनमुळे जवळपास 24 तास एकमेकांशी कनेक्टेड असतो. त्यामुळेच बऱ्याच लोकांना आपल्याला स्मार्टफोनबद्दल फारं माहिती आहे असं वाटतं. पण आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल अगदीच हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या लोकांना कल्पना असते. जवळपास 99 टक्के लोकांना या अक्षरांचा अर्थ काय हे ठाऊक नसतं.

नेटवर्क रेंजच्या बाजूची ती अक्षरं

खरं तर स्मार्टफोनमध्ये आपण ही गोष्ट अगदी दररोज पाहतो. मात्र या गोष्टीबद्दल आपण फारसं जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आपण जाणून घेत नाही. ही गोष्ट तुम्हीही अनेकदा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाहिली असेल. ही गोष्टमध्ये मोबाईलची रेंज दर्शवली जाते त्याच्या बाजूला दिसणारी LTE किंवा VoLTE असे लिहिलेलं दिसतं. मात्र या दोन शब्दांचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? या दोघांमध्ये नेमका काय फरक असतो याचा कदी तुम्ही विचार केलाय का?

या 2 गोष्टींचा अर्थ काय?

तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अनेकदा LTE लिहिलेलं दिसतं. तर कधीतरी VoLTE अशी अक्षरं दिसतात. या दोघांमध्ये फरक आहे. दोन्हीच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेटचा वापर करु शकता. मात्र या दोघांमध्ये एक असा फरक आहे ज्यामुळे मोबाईल वापरण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून जाते. तुमच्या मोबाईलच्या नेटवर्क इंडिकेटरजवळ LTE लिहिलेलं असतं तेव्हा फोन कॉल असल्यास मोबाईलचं इंटरनेट डिस्कनेक्ट होतं. म्हणजेच फोन आल्यावर इंटरनेट कनेक्शन जातं. LTE चा फुलफॉर्म Long Term Evolution असा आहे. या उलट VoLTE लिहिलेलं असल्यास फोन कॉल सुरु असतानाही इंटरनेट कनेक्शन कायम राहतं. म्हणजेच फोनवर बोलता बोलताही युझर्स इंटरनेटचा वापर करु शकतात. VoLTE चा फुलफॉर्म Voice over Long Term Evolution असा आहे.