Sony ने सादर केला धमाकेदार Camera; चालत्या ट्रेनमधून काढा HD फोटो

 मागील दिवसांमध्ये (Sony)ने आपले नवीन इन्टरचेंजेबल लेन्सचा कॅमेरा (Camera) Sony Alpha 7IV सादर केले आहे.

Updated: Oct 23, 2021, 04:46 PM IST
Sony ने सादर केला धमाकेदार Camera; चालत्या ट्रेनमधून काढा HD फोटो title=

नवी दिल्ली : मागील दिवसांमध्ये (Sony)ने आपला नवीन इन्टरचेंजेबल लेन्सचा कॅमेरा Sony Alpha 7IV सादर केला आहे. सोनीच्या या कॅमेऱ्याचे भन्नाटेदार फीचर्स आणि किंमत जाणून घ्या...

चालत्या ट्रेनमधून काढता येईल HD फोटो 
सोनीचा हा कॅमेरा चांगल्या स्पीडचे हायब्रिड फोकस, एआय-बेस्ड रिअल टाइम आय ऑटोफोकस आणि फोटो-व्हिडिओसाठी रिअल टाइम ट्रॅकिंगचे फीचर देतो. एएफ ट्रॅकिंगसह तुम्ही 10fps पर्यंत सलग शुटिंग करू शकता. हा कॅमेरा 94 % इमेज एरिया कवर करून हाय-डेन्सिटी फोकल प्लेन एएफ सिस्टिमवर फेज डिटेक्शन करू शकतात. 

सोनीचे म्हणणे आहे की, हा कॅमेरा चालत्या ट्रेनमध्ये एचडी फोटो काढण्यासोबत उडणाऱ्या पक्षाच्या डोळ्यालासुद्धा कॅप्चर करता येईल. Sony Alpha 7 IV मध्ये लोकांसाठी फेस आणि आय डिटेक्शन फीचर देखील आहे. 

सोनीच्या कॅमेऱ्याचा डिस्प्ले
या कॅमेऱ्यात तुम्हाला  LCD टच आणि OLED क्वॉड वीजीए व्यूफाइन्डरदेखील मिळेल. यामध्ये एस-सिनटोन आणि क्रिएटिव लुकसारखे दहा प्रीसेट्स आणि आठ पॅरामीटर्सवर देण्यात आले आहे. स्टील, मूवी आणि एस ऍंड क्यू मोड्स सिलेक्ट करण्यासाठी यात एक डायलसुद्धा आहे. 

कॅमेऱ्यातून करा लाइव स्ट्रिमिंग
एका युएसबी कनेक्शनच्या माध्यमातून तुम्ही कॅमेऱ्यावर लाइव स्ट्रिमिंग करू शकता. ज्यामध्ये हाय रिझॉल्युशन 4 K व्हिडिओस अंतर्भूत आहे. 

सोनीचा हा कॅमेरा याच वर्षी डिसेंबरमध्ये मार्केटमध्ये लॉंच होऊ शकतो. या कॅमेऱ्याची किंमत साधारण 1 लाख 86 हजार 900 रुपये इतकी असू शकते. यासंबधीची माहिती अद्याप जारी करण्यात आलेली नाही.