Vi चा 'हा' प्लान Jio ला देतोय टक्कर, रोज 4GB डेटा सोबत फ्री कॉलिंग

जियो आणि BSNL ही नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लान्स घेऊन येत असते. तर मग या स्पर्धेत वोडाफोन आणि आयडीया म्हणजेच Vi कंपनी तरी कशी मागे राहणार? 

Updated: Jun 17, 2021, 12:40 PM IST
Vi चा 'हा' प्लान Jio ला देतोय टक्कर, रोज 4GB डेटा सोबत फ्री कॉलिंग

मुंबई : देशातील दिग्गज टेलीकॉम कंपनी रिलायंस जियो आणि BSNL ही नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लान्स घेऊन येत असते. तर मग या स्पर्धेत वोडाफोन आणि आयडीया म्हणजेच Vi कंपनी तरी कशी मागे राहणार? आता Vi कंपनी देखील आपल्या ग्राहकांसाठी तगडा प्लान घेऊन आली आहे. या प्लानमध्ये दररोज तुम्हाला 4GB डाटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याशिवाय SMS सोबतच लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर फ्री अॅक्सेस ही मिळणार आहे.

Vi चा नवीन प्लान

Vi कडे दररोज 4GB डाटा ऑफर करणारे 3 प्लान्स आहेत. यामध्ये 299 रुपये, 449 रुपये आणि 699 रुपये अशा किंमतीचे प्लान्स उपलब्ध आहेत. हे तिन्ही प्लान खूपच खास आहे, ज्यात FUP कंपनीसोबत दररोजचा 4GB डाटा मिळतो. विशेष म्हणजे या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओवर आणि बिंज ऑल नाईटसारखे फायदे मिळत आहेत.

विकेंड डेटा रोलओवर आणि बिंज ऑल नाईट प्लानचे फायदे

विकेंड डेटा रोलओवर म्हणजे विकडेजमध्ये उरलेला डेटा यूजर्स विकेंडमध्ये वापर करु शकतो. तर बिंज ऑल नाईटनुसार, कंपनी तुम्हाला रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा ऑफर करते. या प्लानमध्ये दररोजच्या मिळणाऱ्या डेटामधून काहीही डिडक्ट होत नाही.

तिन्ही प्लानमधील वेगळेपण

या तिन्ही प्लानमध्ये वैधतेशिवाय कुठलाही फरक नाही आहे. 299 रुपयाच्या प्लानची वैधता 28 दिवस, 449 रुपयाच्या प्लानची 56 दिवस तर 699 रुपयाच्या प्लानची वैधता 84 दिवस इतकी आहे. सगळ्या प्लानमध्ये देशभरात कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग फ्री दिली आहे. याशिवाय दररोज 100 SMS फ्री ऑफर करणाऱ्या प्लानमध्ये Vi Movies & Tv Classic चा फ्री अ‍ॅक्सेस दिला जात आहे.