Maruti Alto ने अव्वल क्रमांक गमावला, विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर 1

काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या मारुती स्विफ्ट (Maruti Swift) कार ने खुपच कमी वेळात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. या कार ने आधी बुकिंगचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्यानंतर आता स्विफने सर्वाधिक विक्री होणाऱ्या अल्टो कारला मागे टाकलं आहे.

Updated: May 26, 2018, 10:48 PM IST
Maruti Alto ने अव्वल क्रमांक गमावला, विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर 1 title=

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या मारुती स्विफ्ट (Maruti Swift) कार ने खुपच कमी वेळात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. या कार ने आधी बुकिंगचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्यानंतर आता स्विफने सर्वाधिक विक्री होणाऱ्या अल्टो कारला मागे टाकलं आहे.

एप्रिल महिन्यात स्विफ्ट 22,776 कार ची विक्री करत सेल्सच्या बाबतीत नंबर 1 क्रमांक मिळवला होता. यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये स्विफ्टने अल्टो कार ला मागे टाकत विक्रीच्या बाबतीत अव्वल क्रमांक पटकावला होता. नवी स्विफ्ट कार खरेदी करण्यासाठी अवघ्या काही काळातच एक लाख बुकिंगचा आकडा गाठला होता.

आता तुम्ही विचार करत असाल की मारुती अल्टो विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहीली असेल. मात्र, तसं नाहीये कारण मारुतीच्या डिझायरने 21,401 कारची विक्री करत दुसरा क्रमांक मिळवला. गेल्यावर्षी मे महिन्यात डिझायर कारच्या विक्रीत घट झाल्याचं पहायला मिळालं होतं. तर, मारुती अल्टो कारच्या 21,233 युनिट्सची विक्री झाल्याने तिसरा क्रमांकावर पोहोचली. 

असं खूप काळानंतर पहायला मिळालं आहे की, अल्टो कार विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात कारच्या विक्रीचे आकडे पाहीले तर टॉप 5 च्या कार या मारुती कंपनीच्याच आहेत.

2017 सालच्या एप्रिल महिन्यात विक्रीमध्ये 17,530 युनिट्सची विक्री झालेल्या मारुती बलेनो चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मात्र, यावेळी बलेनोने आधीपेक्षा 20,412 यूनिट्स अधिक विक्री केल्या आहेत. मारुती वॅगनआर यावेळी 16,561 यूनिट्ससह पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.