खुशखबर! तुमची मोबाइलची बिलं होणार स्वस्त

भरमसाठ येणा-या मोबाईल बिलाचं तुमचं टेन्शन आता हलकं होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Sep 20, 2017, 11:10 AM IST
खुशखबर! तुमची मोबाइलची बिलं होणार स्वस्त title=

नवी दिल्ली : भरमसाठ येणा-या मोबाईल बिलाचं तुमचं टेन्शन आता हलकं होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे येत्या १ ऑक्टोबरपासून मोबाईल बिल स्वस्त होणार आहे. १ ऑक्टोबरपासून मोबाईल बिल १४ पैसे प्रती मिनिटांऐवजी ६ पैसे प्रती मिनिट आययूसी वसूल केला जाईल.

ट्रायने सर्व कंपन्यांना दणका देत ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इतर कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल जोडण्यासाठी आययूसी द्यावा लागतो. हा चार्ज सध्या १४ पैसे होता. मात्र आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांनी हा चार्ज वाढवण्याची मागणी केली होती. तर रिलायन्स जिओने हा चार्ज बंद करण्याची मागणी केली होती.

ट्रायच्या या निर्णयाचा फायदा थेट जिओला होण्याची शक्यता आहे. कारण जिओच्या नेटवर्कवरुन एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनवर मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग कॉल केले जातात. त्यामुळे जिओचा आता आययूसी खर्च कमी होणार आहे.