Triumph ची सर्वात दमदार बाईक Rocket 3 GT लॉन्च

Rocket 3GT बाईक भारतात लॉन्च

शैलेश मुसळे | Updated: Sep 12, 2020, 11:48 AM IST
Triumph ची सर्वात दमदार बाईक Rocket 3 GT लॉन्च

मुंबई : ट्रायम्फ (Triumph) ने भारतात आपली सर्वात पावरफुल अशी Rocket 3GT बाईक लॉन्च केली आहे. या दमदार बाईकची एक्स शोरूम किंमत 18.4 लाख रुपये इतकी आहे. भारतातील Triumph ही सर्वात महागडी बाईक बनली आहे. भारतात Triumph ची Rocket 3R बाईक देखील आहे. ही नवी Rocket 3GT जुन्या बाईक पेक्षा 40 हजाराने महाग आहे. याची बुकिंग तुम्ही Triumph च्या शोरूममध्ये करु शकता.

रॉकेट 3GT ही रॉकेट 3R बाईक सारखीच आहे. कारण दोन्ही बाईकची डिझाईन एकसारखीच आहे. ही बाईक ट्विन LED हेडलॅम्प्स आणि DRLs सोबत आहे. बाईकमध्ये टियर ड्रॉप आकाराचीफ्यूल टँक देण्यात आली आहे, बाईकमध्ये दिलेले टायर इतर बाईकच्या टायरच्या तुलनेत अधिक जाड आहेत.

Rocket 3GT चे फीचर्स

बाईकमध्ये TFT इंस्ट्रुमेंट पॅनल दिलं गेलं आहे. ज्यामध्ये स्पीड, टेकोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, ABS स्टेटस सारखी माहिती मिळते. याशिवाय ABS, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, क्रूज कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, की-लेस इग्निशन, हीटेल ग्रिप्स, डेटिकेटेड ग्रो प्रो कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम फीचर ही देण्यात आलं आहे. या सोबत स्पोर्ट, रेन, रोड आणि राइडर कफीगर्ड सारखे राइडिंग मोड्स देखील देण्यात आले आहेत. याआध्ये 320 मिमी डिस्क ब्रेक-अप आणि रियरमध्ये 300 मिमी डिस्क देण्यात आली आहे. सध्या Rocket 3GT बाईक २ रंगामध्ये आहे. फँटम ब्लॅक आणि सिल्वर एंड ग्रे. 

Rocket 3GT इंजिन
ट्रायम्फकडून या बाईकमध्ये 2.5 लीटर थ्री सिलिंडर 2485cc इंजिन देण्यात आलं आहे. जी 165bhp पावर आणि 221Nm टॉर्क जनरेट करतात. बाईकमध्ये 6 स्पीड गियरबॉक्स आहे. तसेच ट्विन 320mm फ्रंट आणि सिंगल 300mm रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.