Google वर सर्वाधिक सर्च, 'कोरोनाची कॉलर ट्यून कशी हटवायची', मोबाईल वापरकर्ते त्रस्त

गूगल सर्चमध्ये सर्वाधिक कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्याबाबत प्रश्न विचारले गेले. 

सुरेंद्र गांगण | Updated: Sep 11, 2020, 05:50 PM IST
Google वर सर्वाधिक सर्च, 'कोरोनाची कॉलर ट्यून कशी हटवायची', मोबाईल वापरकर्ते त्रस्त  title=

मुंबई : गूगल सर्चमध्ये सर्वाधिक कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्याबाबत प्रश्न विचारले गेले. यावर्षी मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणूची प्रकरणे समोर येऊ लागली. कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली. विविध जाहिरातींद्वारे लोकांना जागरूक करून, देशभरात लॉकडाऊन सुरू केले. कोरोना विषाणूबद्दल जागरूकता करविण्यासाठी सर्व नेटवर्क कॉलर ट्यून देखील सेट केली आहे. तथापि, सर्वात जास्त चर्चा कॉलर ट्यूनबद्दल आहे. आम्ही हे सांगत नाही, उलट गूगल सर्चच्या ऑगस्ट २०२० मध्ये त्याचा खुलासा झाला आहे.

कोरोना विषाणू देशात आला आहे तेव्हापासून हा कॉलर ट्यून ऐकून लोक अस्वस्थ होत आहेत. ही रिंगटोन काढण्यासाठी लोक इंटरनेटवर सर्वाधिक शोध घेत आहेत. सुरुवातीला बर्‍याच सोशल साइट्सचा असा दावा होता की १ आकडा दाबल्याने कॉलर ट्यून थांबेल, परंतु असे घडले नाही. आता मागील सहा महिन्यांपासून लोक Google वर हा कॉलर ट्यून काढण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांवर शोध घेण्यात येत आहे.

गूगलच्या अहवालात, ऑगस्ट २०२० मध्ये सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नात कोरोनाचा कॉलर ट्यून काढण्याबाबत प्रश्न विचारले गेले आहेत. ज्यामध्ये जिओ नेटवर्कवरील कोरोना कॉलर ट्यून काढण्याचा प्रश्न सर्वात जास्त झाला आहे.

गूगलचे अन्य सर्च ट्रेंड

कोरोना व्यतिरिक्त, ऑगस्टमध्ये गुगल सर्च ट्रेंडमध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडचा शोध घेतला. गूगल सर्च ट्रेंडनुसार Pakistan vs England शोधात +5,000 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी दुसर्‍या क्रमांकावर प्रणव मुखर्जीचा शोध घेण्यात आला. त्यात +4,000 टक्के वाढ झाली आहे. 

गूगल सर्चचा डेटा बघून तुम्ही अंदाज लावू शकता की कोरोना व्हायरसमुळे लोक किती घाबरले आहेत. याशिवाय मागील सहा महिन्यांपासून सतत झळकणारी कोरोना कॉलर ट्यून आता लोकांना त्रास देत आहे. ही रिंगटोन ऐकल्यानंतर लोक अस्वस्थ होत आहेत आणि ते काढण्याचे मार्ग शोधत आहेत.