ट्वीटरवरुन करा पैशांचा व्यवहार, अशी पाठवा एकमेकांना रक्कम

 एकमेकांना पैसे पाठवू शकता

Updated: May 8, 2021, 02:00 PM IST
ट्वीटरवरुन करा पैशांचा व्यवहार, अशी पाठवा एकमेकांना रक्कम title=

नवी दिल्ली : ट्विटर गेल्या काही काळापासून सतत नवीन फिचर्सवर काम करत आहे.  ट्विटरने नुकतेच टीप जार (Tip Jar) हे फिचर आणले आहे. या मदतीने लोक एकमेकांना पैसे पाठवू शकतील. हे फिचर आयओएस आणि अँड्रॉइड दोन्हीवर उपलब्ध असेल. सध्या, केवळ काही निवडक वापरकर्ते या फिचरचा आनंद घेऊ शकतात. सध्या पत्रकार, विविध माध्यमातील तज्ञ, निर्माते आणि नॉन प्रॉफीट ऑर्गनायजेशन्सना हे वापरात दिलं गेलय. परंतु कंपनी लवकरच सर्व युजर्सपर्यंत हे पोहोचणार आहे.

या पेमेंटसाठी कोणतेही कमिशन आकारले जाणार नाही हे ट्विटरने जाहीर केलंय. ट्विटर टिप जार हे फीचर लवकरच सर्वांच्या मोबाईलमध्ये दिसले पण कंपनीने याची तारीख निश्चित केलेली नाही. हे वैशिष्ट्य ट्विटर वापरकर्त्यांना पैशांचा व्यवहार करण्यास मदत करेल. 

याद्वारे तुम्हाला आवडणाऱ्या ट्वीट्सच्या युजर्सना तुम्ही टीप देऊ शकता. Android मध्ये, हे टिप जार वैशिष्ट्य Spaces देखील कार्य करेल, जे ट्विटरचे लाइव्ह ऑडिओ आधारित फिचर आहे. 

ट्विटरच्या माध्यमातून लोकांना पैसे देऊन आधार देण्याच्या प्रयत्नाची ही पहिली पायरी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

असे वापरा Tip Jar

-हे फिचर वापरण्यासाठी आपल्या प्रोफाइल एडीट पर्यायावर जा.
-टीप-जारचे फिचर दिसेल.
-जेव्हा आपण या चिन्हावर टॅप कराल तेव्हा इनेबल पेमेंट सेवा आणि प्लॅटफॉर्मची लीस्ट आपल्या दिसेल.
-या लिस्टमधून कोणत्याही पेमेंटसाठी एक सर्व्हिस निवडा

यानंतर, आपल्याला आपल्या पेमेंट संबंधित माहिती जोडावी लागेल. ज्यानंतर आपण ट्विटर टिप जार वैशिष्ट्याचा वापर करु शकाल.