गाडीतील एअरबॅगची किंमत फक्त इतकी आहे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा खुलासा

 केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने पॅसेंजर कारमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. त्यामुळे त्यामुळे गाड्यांचे दर वाढतील अशी चर्चा आहे. 

Updated: Aug 7, 2022, 12:58 PM IST
गाडीतील एअरबॅगची किंमत फक्त इतकी आहे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा खुलासा title=

Nitin Gadkari On Car Airbag Price: भारतात दरवर्षी हजारो अपघात होत असतात आणि या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो. यासाठी केंद्र सरकारने कठोर नियमावली तयार केली आहे. प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ऑटो कंपन्यांना सुरक्षिच्या दृष्टीने सूचना देखील केल्या आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने पॅसेंजर कारमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. त्यामुळे त्यामुळे गाड्यांचे दर वाढतील अशी चर्चा आहे. जर स्वस्त हॅचबॅक कारच्या बेस व्हेरियंटमद्ये 6 एअरबॅग्स लावल्या तर गाडीची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत वाढेल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे गाडी सामान्यांच्या बजेटबाहेर जाईल? अशी टीका होत आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा केला आहे. एका एअरबॅग्सची किंमत फक्त 800 रुपये असल्याचं त्यांनी संसदेत ठामपणे सांगितलं आहे. 

लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात एअरबॅगचा मुद्दा एका खासदाराने उपस्थित केला आणि विचारले सरकारने प्रत्येक कारमध्ये किमान 6 एअरबॅग देणे बंधनकारक केल्या आहेत. त्याच्या मसुदा अधिसूचनेची तारीख या वर्षी ऑक्टोबरची आहे. त्याची अधिसूचना कधी येणार? या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. तथापि, कार कंपन्यांसाठी ते कधी बंधनकारक असेल याची कोणतीही टाइमलाइन त्यांनी स्पष्ट केली नाही.

देशात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात आणि सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. आतापर्यंत, कारमधील ड्रायव्हर आणि पुढच्या सीटच्या पॅसेंजर सीटसाठी एअरबॅग्ज अनिवार्य केल्या गेल्या आहेत परंतु मागे बसलेल्या लोकांसाठी नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, एअरबॅगची किंमत फक्त 800 रुपये आहे. आणि सर्व प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.