एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिड कार्डची गरज नाही

एटीएमवर सर्वांना या सुविधेचा लाभ घेता येणार

Updated: Apr 2, 2021, 06:20 PM IST
एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिड कार्डची गरज नाही title=

नवी दिल्ली : एटीएम (ATM) निर्माता कंपनीने नुकतेच यूपीआय  (UPI) बेस्ड सॉल्यूशन सुरू केलंय. ज्याद्वारे यूपीआय अॅपमध्ये असलेल्या क्यूआर कोडच्या मदतीने एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात. ही संपूर्ण प्रक्रियेत एटीएमला स्पर्श करण्याची गरज भासणार नाही. लवकरच जवळच्या एटीएमवर सर्वांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी यापुढे डेबिट कार्डची आवश्यकता नाही. तुम्ही यूपीआयद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून एटीएममधून पैसे काढता येतील. यासाठी, एनसीआर कॉर्पोरेशनच्या एटीएम कॉर्पोरेशनने अलीकडेच यूपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित पहिला आयसीसीडब्ल्यू सोल्यूशन सुरू केलाय. झी न्यूजने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

सिटी युनियन बँकेने (Citi Union Bank) एनसीआर कॉर्पोरेशनशी (NCR Corporation) हातमिळवणी केली आहे. आतापर्यंत 1500 हून अधिक एटीएम अपग्रेड करण्यात आले आहेत. तर बर्‍याच ठिकाणी वेगवान अपग्रेड करण्याचे काम सुरू आहे.

नव्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रथम आपण स्मार्टफोनवर कोणतेही यूपीआय अॅप (GPay, BHIM, Paytm, Phonepe, Amazon) उघडले पाहिजे. यानंतर एटीएम स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला किती पैसे काढायचे आहेत तो आकडा फोनवर एंटर करावा लागेल. 

यानंतर प्रोसिडचे बटण दाबावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 4 किंवा 6 अंकी यूपीआय पिन मागितला जाईल. हा नंबर एंटर करताच तुम्हाला एटीएममधून  कॅश मिळेल. सुरुवातीला, अशाप्रकारे आपण केवळ 5 हजार रुपये काढू शकाल.

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface)ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. जी मोबाइल अ‍ॅपद्वारे एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात त्वरित पैसे हस्तांतरित करू शकते. यासाठी आपल्याला आपल्या बँक खात्याचा यूपीआय अॅपशी लिंक करावे लागेल. एका यूपीआय अॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट करून आपण पैसे ट्रान्सफर करू शकता.