या Trick ने मेमरी कार्डच बनेल तुमच्या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी

मेमरी कार्ड खराब झालं किंवा हरवलं तर संपूर्ण डेटा आपण गमावतो. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 26, 2018, 05:49 PM IST
या Trick ने मेमरी कार्डच बनेल तुमच्या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी title=

नवी दिल्ली : स्मार्टफोनमधील इंटरनल मेमरी आपल्यापैकी अनेकांना कमीच वाटते. त्यामुळे ही मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने वाढवण्यात येते. पण, कधी मेमरी कार्ड खराब झालं किंवा हरवलं तर संपूर्ण डेटा आपण गमावतो. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये.

कारण आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या आधारे तुम्ही मेमरी कार्डलाच तुमची इंटरनल मेमरी बनवू शकता. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अॅप डाऊनलोड करण्याचीही गरज नाहीये. 

तुम्ही अवघ्या काही सिंपल स्टेप्सच्या सहाय्याने फोनच्या सेटींगमध्ये बदल करुन असं करु शकता. पाहूयात काय आहे ही ट्रिक...

अशी वाढवा इंटरनल मेमरी

आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही फोनची इंटरनल मेमरी आणि मेमरी कार्ड एकत्र करु शकाल. त्यामुळे तुम्हाला अधिक मेमरी वापरण्यास मिळेल. तसेच फोनची मेमरी फुल झाल्यावर तुम्हाला मीडिया फाईल्स SD कार्डमध्ये मूव्ह करण्याची गरज पडणार नाही. 

करा केवळ ही एक सिंपल ट्रिक

फोनची इंटरनल मेमरी आणि मायक्रो एसडी कार्डची मेमरी एकत्र करण्यासाठी सर्वातआधी सेटिंगमध्ये असलेल्या स्टोरेज (Storage)वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये Portable Storage (पोर्टेबल स्टोरेज)चं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर फोनमध्ये नवं पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही टॉपवर दिलेल्या तीन डॉटला टॅप करा.

त्यानंतर पुन्हा सेटिंगचा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करा. Settingsमध्ये गेल्यावर Format as Internal वर क्लिक करा.

मग, तुम्हाला Erase & Format या ऑप्शनवर टॅप करावं लागेल आणि दिलेली प्रोसेस पूर्ण करावी लागेल. मात्र, असं करण्यापूर्वी तुमचा संपूर्ण डेटा सेव्ह करुन ठेवा. जेणेकरुन डिलीट झाल्यास तो तुम्हाला पुन्हा मिळू शकेल.

ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर इंटरनल स्टोरेज SD Card मधून घेईल. त्यानंतर तुम्ही जो कुठला अॅप किंवा गेम इंस्टॉल कराल तो थेट इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होईल.