Valentine's Day Offer By Sony: जोडीदाराला द्या भन्नाट Gift; 'सोनी'कडून 9000 रुपयांपर्यंत सूट

Valentine's Day Offers On Sony Products: व्हॅलेंटाइन्स विकदरम्यान सोनी इंडियाचा हा खास सेल सुरु राहणार असून अनेक प्रोडक्टवर मोठी सूट कंपनीने दिली असून हजारो रुपयांची बचत करण्याची आणि आपल्या जोडीदाराला स्वस्तात मस्त गिफ्ट देण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Updated: Feb 7, 2023, 08:38 PM IST
Valentine's Day Offer By Sony: जोडीदाराला द्या भन्नाट Gift; 'सोनी'कडून 9000 रुपयांपर्यंत सूट
Valentine Day Offers On Sony Products

Valentine's Day Offers On Sony Products: 'सोनी इंडिया'ने (Sony India) व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने (Valentine's Day Offers) आपल्या ऑडिओ सेगमेंटमधील वेगवेगळ्या उपकरणांवर मोठी सूट आणि कॅशबॅकची घोषणा केली आहे. इनझोन गेमिंग सीरीजच्या हेडफोन्सबरोबरच नव्यानेच लॉन्च झालेल्या WH-1000XM5 आणि WH-100XM4 ANC हेडफोन्सवरही मोठी सूट देण्यात आली आहे. 

WH-1000X4 हा ट्रू वायरलेस ANC ईयरबड्ससहीत उपलब्ध असलेल्या कंपनीच्या ट्रू व्हायरलेस रेंजवरही सूट आणि कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय सोनी साउंडबार आणि पार्टी स्पीकर्सच्या रेंजवर मोठी सूट देण्यात आली आहे.

कधीपर्यंत आहे सूट?

सूट आणि कॅशबॅक ऑफर 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत असेल असं कंपनीने म्हटलं आहे. सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्युझिव्ह, शॉपॅटएससी, मुख्य इलेक्ट्रॉनिक स्टोअर, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसहीत सोनीच्या रिटेल स्टोअर्समध्ये ही सूट लागू असणार आहे. हेडफोन्स आणि त्यावरील ऑफर्ससंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...

> नॉइज कॅन्सलेशन हेडफोन (WH-1000XM4 मॉडल) ची किंमत 29,990 रुपये इतकी आहे. ऑफरमध्ये हे हेडफोन 19,990 रुपयांना मिळत आहे.

> नॉइज कॅन्सलेशन हेडफोन (WH-1000XM5 मॉडल ) ची किंमत 34,990 रुपये आहे. ऑफरमध्ये हे हेडफोन 29,990 रुपयांना उपलब्ध आहेत.

> नॉइज कॅन्सलेशन हेडफोन (WH-XB910N मॉडल ) ची किंमत 19,990 रुपये आहे. ऑफरमध्ये हे हेडफोन 10,990 रुपयांना उपलब्ध आहेत. याचबरोबर यावर 2000 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे.

> नॉइज कॅन्सलेशन हेडफोन (WH-CH710N मॉडल) ची किंमत 14,990 रुपये आहे. ऑफर मध्ये हे हेडफोन 6,990 रुपयांना मिळत आहेत.

> ट्रूली वायरलेस ईयरबड (WF-1000XM4 मॉडल) ची किंमत 26,990  रुपये आहे. ऑफर मध्ये हे ईयरबड 13,990 रुपयांना मिळत आहे. में मिल रहा है. याचबरोबर यावर 3000 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे.

> ट्रूली वायरलेस ईयरबड (WF-LS900N मॉडल) ची किंमत 24,990 रुपये इतकी आहे. ऑफरमध्ये 10,990 रुपयांना हे ईयरबड उफलब्ध असून यावरही 3000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.

> ट्रूली वायरलेस ईयरबड (WF-L900 मॉडल ) ची किंमत 19,990 रुपये आहे. ऑफरमध्ये हे ईयरबड केवळ 7,990 रुपयांना उपलब्ध आहेत. यावर 2000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.