व्यक्तीने iPhone 11 आणि Nokia 3310 गाडीच्या टायरखाली ठेवले, पाहा व्हिडिओ कोणी मारली बाजी

iPhone 11 Vs Nokia 3310:  आयफोन हा सर्वात मजबूत फोन मानला जातो. म्हणूनच आयफोनची क्रेझ लोकांमध्ये खूप आहे.  

Updated: Aug 4, 2021, 02:42 PM IST
व्यक्तीने iPhone 11 आणि Nokia 3310 गाडीच्या टायरखाली ठेवले, पाहा व्हिडिओ कोणी मारली बाजी

मुंबई : iPhone 11 Vs Nokia 3310:  आयफोन हा सर्वात मजबूत फोन मानला जातो. म्हणूनच आयफोनची क्रेझ लोकांमध्ये खूप आहे. बरेच लोक आयफोनवर अनेक प्रयोग करत आहेत. अलीकडेच, काहींनी फटाक्यांच्या बॉक्समध्ये आयफोन ठेवला. तर एवढेच नाही तर काहींनी आयफोनला अॅसिडमध्ये बुडवला. आता आयफोन 11 वर एक वेगळा प्रयोग करण्यात आला. एकेकाळी सर्वात मजबूत फोन मानल्या जाणाऱ्या नोकिया 3310 ची आयफोन 11 शी स्पर्धा होती. दोन्ही फोनवरुन कारचा टायर चावला गेला. पाहा निकाल काय लागला ...

iPhone 11 आणि Nokia 3310  ठेवला कारच्या टायरखाली

प्रसिद्ध YouTuber HaerteTest ने iPhone 11 आणि Nokia 3310 चा एक आश्चर्यकारक प्रयोग केला. त्याने दोन्ही फोन कारच्या टायरखाली ठेवले. दोन फोनपैकी कोणता सर्वात शक्तिशाली आहे, हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. नोकिया 3310 गाडीच्या टायरखाली ठेवला. ड्रायव्हरने बराच वेळ फोनवर टायर ठेवले. त्यानंतर त्या व्यक्तीने टायरच्या खाली आयफोन 11 ठेवला आणि त्यावरुन गाडी नेली. त्यानंतर फोनची अशी अवस्था झाली.

आश्चर्यकारक परिणाम

नोकिया 3310 चे मागील कव्हर तुटले होते आणि फोन चालू होत नव्हता. त्याच वेळी, आयफोन 11 चे मागील पॅनेल तुटले होते. व्यक्तीने आयफोन चालू केलेला दिसला नाही.

हा व्हिडिओ नोव्हेंबर 2019 मध्ये शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत 5 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 4 लाखांहून अधिक लाइक्स आणि 30 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. कृपया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे स्टंट करू नका. हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केले गेले आहे. तुम्ही असे केल्यास तुम्हाला दुखापत होऊ शकते.