२४ मेगा पिक्सल सेल्फी कॅमेऱ्याच्या या फोनला भरघोस मागणी

'व्हिवो व्ही ७ प्लस' हा स्मार्टफोन ५.९ इंच एचडी रिजल्यूशन डिस्प्ले आणि २४ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह केवळ २१,९९० रुपयांत उपलब्ध आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 15, 2017, 05:29 PM IST
२४ मेगा पिक्सल सेल्फी कॅमेऱ्याच्या या फोनला भरघोस मागणी title=

नवी दिल्ली : 'व्हिवो व्ही ७ प्लस' हा स्मार्टफोन ५.९ इंच एचडी रिजल्यूशन डिस्प्ले आणि २४ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह केवळ २१,९९० रुपयांत उपलब्ध आहे. आजपासून भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. व्हिवो व्हि ७ + ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर मिळत आहे.  ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, टाटा क्लिक आणि अॅमेझॉनवर वेगेवेगळ्याऑफर्ससह उपलब्ध आहे.
 
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यात महत्त्वाचे फिचर्स देण्यात आले आहेत. तुमच्या बॉसचा चेहरा बघून हा फोन अनलॉक होईल. याव्यतिरिक्त, हँडसेटच्या मागील पॅनेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा प्रदान करण्यात आला आहे.

हे आहेत खास फिचर्स 

कनेक्टीव्हीटी
४ जी व्होलेट,वाय-फाय, ब्ल्यूटूथ 4.2, ड्युअल सिम 

रंग
हँडसेट गोल्ड, मॅट ब्लॅक आणि रोझ गोल्ड रंगात उपलब्ध आहे.