close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी खुशखबर, ५० टक्के डिस्काऊंट मिळणार

विलिनीकरण झाल्यानंतर आयडिया आणि वोडाफोन प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी वेगवेगळे प्लान लॉन्च करत आहे.

Updated: Oct 17, 2018, 06:55 PM IST
वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी खुशखबर, ५० टक्के डिस्काऊंट मिळणार

मुंबई : विलिनीकरण झाल्यानंतर आयडिया आणि वोडाफोन प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी वेगवेगळे प्लान लॉन्च करत आहे. आता कंपनीनं पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना पोस्टपेड मासिक बिलावर ५० टक्के सूट मिळणार आहे. याआधी कंपनीनं प्रिपेड ग्राहकांसाठीही ऑफर आणल्या होत्या.

२४०० रुपयांपर्यंत कॅशबॅक

सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डवर वोडाफोन-आयडियाच्या पोस्टपेड ग्राहकांना डिस्काऊंट मिळणार आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना वर्षाला जास्तीत जास्त २४०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. एका वर्षाचा २४०० म्हणजेच महिन्याला २०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. बिल पेमेंट माय वोडाफोन अॅप किंवा माय आयडिया अॅपच्या माध्यमातून करावं लागणार आहे.

या प्लानवर ऑफर

कॅशबॅक ऑफरसाठी तुमच्याकडे ३९९ रुपयांचा वोडाफोन रेड प्लान किंवा आयडियाचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान असणं आवश्यक आहे. ३९९ रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना २०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. पण २९९ रुपयांच्या प्लानसाठी ही ऑफर मिळणार नाही.