वोडाफोन युजर्सला १५१ रुपयांत मिळतील 'या' सुविधा...

रिलायन्स जिओच्या लॉन्चमुळे टेलिकॉम कंपन्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा सुरू झाली आहे.

Updated: Feb 21, 2018, 06:26 PM IST
वोडाफोन युजर्सला १५१ रुपयांत मिळतील 'या' सुविधा... title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या लॉन्चमुळे टेलिकॉम कंपन्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा सुरू झाली आहे. जिओला टक्कर देण्यासाठी अन्य कंपन्या स्वस्त दरात नवनवे प्लॅन्स सादर करत आहे. गेल्या काही दिवसात एअरटेल आणि बीएसएनएलचे काही स्वस्त प्लॅन्स बाजारात आले. आता वोडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी दोन नवीन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत. पहिला प्लॅन १५८ रुपयांचा असून या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगव्यतिरिक्त 28 GB 4G/3G डेटा मिळेल. 

प्रत्येक दिवशी २५० मिनिटांचे व्हाईस कॉलिंग

अनलिमिटेड कॉलिंगच्या अंतर्गत युजर प्रत्येक दिवशी २५० मिनिटांची व्हाईस कॉलिंगची सुविधा मिळेल. त्याचबरोबर युजर १ आठवड्यात १००० मिनिटांहून अधिक व्हाईस कॉलिंग करू शकणार नाही. या प्लॅनची व्हलीडिटी २८ दिवसांची आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी तुम्हाला 1 GB डेटा मिळेल. मात्र प्रत्येक दिवशी 1 GB इतका डेटा वापरलाच पाहिजे, असे काही नाही. गरजेनुसार तुम्ही त्याचा वापर करु शकता. दुसरा प्लॅन १५१ रुपयांचा आहे. यात युजर्सला २८ दिवसात अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच  1 GB 4G/3G डेटा मिळेल. म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्ही दर दिवसाला  1 GB हुन अधिक डेटा वापरू शकणार नाही.

या युजर्संना मिळेल लाभ

१५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. वोडाफोनने हे दोन्हीही प्लॅन्स फक्त केरळ सर्कलमध्ये लागू केले आहेत. वोडाफोनने हा प्लॅन दिल्ली आणि मुंबईत लागू केलेला नाही. या भागात वोडाफोनचा १९८ रुपयांचा प्लॅन आहे. ज्याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. यात प्रत्येक दिवशी युजरला 1.4 GB 4G/3G डेटा मिळेल. याशिवाय युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगसोबत दरदिवसाला 100 एसएमएस देखील मिळतील. 

हा आहे प्लॅन

वोडाफोनचा १५८ रुपयांचा प्लॅन जिओच्या १४८ रुपयांच्या प्लॅनप्रमाणे आहे. जिओच्या १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत प्रत्येक दिवशी 100 एसएमएस आणि 1.5 GB डेटाची सुविधा २८ दिवसांसाठी मिळेल. एअरटेलच्या १६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला २८ दिवसांपर्यंत प्रत्येक दिवशी 1 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिेळेल.