भारतात लॉन्च झाला सर्वात स्लीम एलईडी टीव्ही

चायनिज कंपनी शिओमीने भारतामध्ये मोबाईल फोन लॉन्च करत मोठं मार्केट कॅप्चर केलं होतं. अशातच कंपनीने आता एलईडी टीव्ही देखील भारतात लॉन्च केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 21, 2018, 04:53 PM IST
भारतात लॉन्च झाला सर्वात स्लीम एलईडी टीव्ही title=

नवी दिल्ली : चायनिज कंपनी शिओमीने भारतामध्ये मोबाईल फोन लॉन्च करत मोठं मार्केट कॅप्चर केलं होतं. अशातच कंपनीने आता एलईडी टीव्ही देखील भारतात लॉन्च केला आहे.

नवीन टीव्ही लॉन्च

शिओमीच्या Mi LED Smart TV 4 ची किंमत 39,999 रुपये आहे. ज्यासोबत इंस्टॉलेशन, IR केबल आणि तीन महिन्यासाठी Sony Live अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. Mi स्मार्ट TV4 हा 55 इंचाचा LED डिसप्ले असणारा टीव्ही आहे. या टीव्हीची विक्री फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑफिशियल स्टोर आणि Mi होम रिटेल स्टोर्सवप 22 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

सर्वात स्लीम टीव्ही

या टीव्ही मध्ये 4.9 मिमी अल्ट्रा-थिन फ्रेमलेस मेटल बॉडी देण्यात आली आहे. यासोबत एक साउंड सिस्टम देण्यात येणार आहे. जो डॉल्बी एटमॉस प्लस DTS-HD ला सपोर्ट करतो. हा जगातील सर्वात स्लीम एलईडी टीव्ही असल्याचं बोललं जातंय. Xiaomi Mi TV4 मध्ये 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रेजोल्यूलेशन 3840 x 2160 पिक्सल्स आहे. यामध्ये 178 डिग्री व्यूविंग अँगल देण्यात आला आहे.