नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने पुन्हा एकदा दोन नवे कोरे प्लॅन लॉन्च केले आहेत. त्यापैकी व्होडाफोनचे दोन्ही प्लॅन जिओच्या 84 दिवसांच्या प्लॅनला टक्कर देणार आहेत. त्यातील पहिला प्लॅन हा 84 दिवसांसाठी तर, दुसरा 70 दिवसांसाठी असणार आहे.
व्होडाफोनने 84 दिवसवाल्या प्लॅनअंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग दिले आहे. मात्र त्यासाठी एक अटही ठेवली आहे. व्होडाफोनच्या या प्लॅनचे वैशिष्ट्य असे की, हा प्लॅन घेतल्यावर ग्राहकाला रोमिंग फ्री कॉल करता येऊ शकतो. पण, अट इतकीच की, या प्लॅनअंतर्ग ग्राहक एका दिवसात 250 पेक्षा जास्त जास्त कॉल करू शकत नाही. तसेच, संपूर्ण आठवड्यात 1,000 पेक्षा जास्त कॉल करू शकणार नाही. जर एकाद्या ग्राहकाने जास्त कॉल केले तर, त्याला त्यावर चार्ज भरावा लागेल. दरम्यान, या प्लॅनमधील डेटाबाबत चर्चा करायची तर यात ग्राहकाला प्रतिदिन 1GB डेटा मिळणार आहे. सोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 SMSही मिळणार आहेत. हा प्लॅन 509 रूपायांना उपलब्ध आहे.
दरम्यान, व्होडाफोनचा दुसरा प्लॅन 450 रूपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकाला 70 दिवसांची वैधता मिळे. यातही ग्राहकाला प्रतिदिन 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. हा प्लॅनही सर्वसाधारणपणे 509 रूपायांच्या प्लॅनसारखाच आहे. फक्त या प्लॅनची मर्यादा 70 दिवसांसाठी असणार आहे.
दरम्यान, व्होडाफोन टक्कर देत असलेल्या रिलायन्सा प्लॅनहा 459 आणि 399 रूपयांचा आहे. पहिल्या प्लॅनअंतर्गत रिलायन्स जिओ ग्राहकाला 84 दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग, मेसेज सुविधा तसेच, प्रतिदिन 1GB डेटा देत आहे. तोही हायस्पीड. डेटा संपल्यावर ही इंटरनेट सुरू राहिल. पण, त्याचे स्पीड कमी होत जाते(64kbps). तर, 399 वाल्या प्लॅनमध्येही 459 रूपयांच्या प्लॅनसारख्याच सुविधा मिळतात पण त्याची वैधता 70 दिवसांसाठी असणार आहे.