Volvo ची नवीन Volvo Ex90 इलेक्ट्रीक SUV ची पहिली झलक, पाहा काय आहे यात खास?

Volvo Ex90 electric SUV : का आहेत या गाडीचे वैशिष्टे. जाणून घ्या.

Updated: Nov 10, 2022, 09:17 PM IST
Volvo ची नवीन Volvo Ex90 इलेक्ट्रीक SUV ची पहिली झलक, पाहा काय आहे यात खास? title=

मुंबई : इलेक्ट्रीक कार मार्केटमध्ये आणखी एक इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच दाखल होत आहे. व्हॉल्वो ही नवीन एसयुव्ही लॉन्च करणार आहे. नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये काय खास असेल. त्याचे फीचर्स काय आहेत चला जाणून घेऊया. नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही EX-90 ही गाडी व्होल्वो बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

गाडीला एक मोठा हेडलाइट देण्यात आला आहे. सोबत मोठे टायर आणि अलॉय देखील देण्यात आले आहेत. सात सीटर एसयूव्हीची रचना करताना जागेचा व्यवस्थिती वापर करण्यात आलाय. त्यामुळेच बॅटरी ही फ्लोरच्या खाली बसवण्यात आली आहे. व्होल्वोची नवी लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही पुढील वर्षी भारतात येऊ शकते. मर्सिडीजच्या इलेक्ट्रिक सेव्हन सीटर SUV EQS सोबत ती स्पर्धा करेल.

व्होल्वोने नवीन EX-90 च्या इंटिरिअरलाही अतिशय आलिशान लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीत मोठा डिजिटल एमआयडी देण्यात आला आहे. ज्यामध्ये एसयूव्हीचा वेग, गीअर माहितीसोबतच एसयूव्हीचा डिजिटल डिस्प्लेही देण्यात आला आहे, ज्यामध्ये रस्त्यावरील इतर वाहनांचीही माहिती मिळेल. यासोबत खूप मोठी टचस्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये नेव्हिगेशन, म्यूझिक, फोन, चार्जिंगच्या माहितीसह अनेक माहिती मिळेल.

गाडीमध्ये पॉवरफुल ड्युअल इलेक्ट्रिक मोटर दिली जाण्याची शक्यता आहे. खूप चांगल्या क्षमतेची बॅटरीही दिली जाणार आहे. यामुळे एका चार्जमध्ये कार सुमारे 550 ते 600 किलोमीटर चालवता येते.