'अमजद खान यांना 'कितने आदमी थे?' डायलॉग मीच शिकवला! अख्खा 'शोले' रमेश सिप्पींनी डायरेक्ट केलेला नाही'

Sachin Pilgaonkar Sholay : सचिन पिळगांवकरांनी एका मुलाखतीत 'शोले' च्या दिग्दर्शनाविषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 27, 2024, 05:32 PM IST
'अमजद खान यांना 'कितने आदमी थे?' डायलॉग मीच शिकवला! अख्खा 'शोले' रमेश सिप्पींनी डायरेक्ट केलेला नाही' title=
(Photo Credit : Social Media)

Sachin Pilgaonkar Sholay : 'शोले' हा भारतीय चित्रपटातील आयकॉनिक चित्रपट आहे. या चित्रपटातून रमेश सिप्पी यांच्या करिअरचा सगळ्यात मोठी चित्रपट म्हटला जात होता. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं बजेट हे 3 कोटी होतं तर या चित्रपटानं 35 कोटींची कमाई केली होती. रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'शोले' या चित्रपटाला सगळ्यात चांगला चित्रपट म्हटले जाते. मात्र, आता अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की रमेश सिप्पी यांनी संपूर्ण चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नव्हतं. 

सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं की 'शोले' चा सगळ्यात जास्त भाग हा त्यांनी आणि अमजद खान यांनी दिग्दर्शित केला होता. सचिन यांनी कुणाल विजयकरला दिलेल्या एका मुलाखतीत केला की त्यांनी आणि अमजद खान यांनी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे अनेक सीन्स हे डायरेक्ट केले होते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सचिन पिळगांवकरनं सांगितलं की' रमेशजींनी काही अ‍ॅक्शन सीक्वेंस करण्यासाठी दुसरं यूनिट ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्यात लीड कलाकार नसणार होते. त्यात फक्त पासिंग शॉट्स असणार होते. त्यासाठी त्यांनी स्टंट सीनसाठी दिग्दर्शक मोहम्मद अली भाई यांना ठेवलं होतं. ते लोकप्रिय स्टंट डायरेक्टर होते आणि त्यांच्यासोबत दिग्दर्शक अजीम भाई होते.'

सचिन पिळगांवकरांनी पुढे सांगितलं की 'ते हॉलिवूडमधून आणखी दोन लोकांना घेऊन आले होते जिम आणि जेरीला घेऊन आले होते. ते दोघे परदेशातून आले होते त्यामुळे रमेश जींची इच्छा होती की त्यांच्याकडून देखील आणखी दोन लोक असायला हवे, म्हणजे परदेशातून आलेल्या या टेकनिशियन्सना कळेल की चित्रपटात नक्की काय होतंय हे त्यांना कळू शकेल. त्यावेळी यूनिटमध्ये दोन काही काम न करणारे लोकं होते. एक होते अमजद खान आणि दुसरा मी.'

याशिवाय रिपोर्ट्सनुसार, सचिन यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की चित्रपटातील अनेक डायलॉग्स हे त्यांनी दिले आहेत. 

हेही वाचा : 'श्रीदेवी आणि जूही चावला L.S आहेत'; नम्रता शिरोडकरचं 'ते' चॅट व्हायरल झाल्याने खळबळ

सचिन पिळगावंकरांनी सांगितलं की रमेश सिप्पी हे फक्त धर्मेंद्र, संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन यांचे सीन शूट करण्यासाठी यायचे आणि बाकी काम ते आणि अमजद खान सांभाळायचे. चित्रपटात जिथे अमजद खान यांनी गब्बरची भूमिका साकारली होती, तिथे सचिन यांनी अहमद ही भूमिका साकारली होती. तर अमिताभ आणि धर्मेंद्र हे जय-वीरूच्या भूमिकेत दिसले होते.