Pune Porsche Car Accident: पुण्यातील अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. अपघात घडला त्या रात्री अल्पवयीन आरोपीचे वडील आणि भाऊ देखील दारू प्यायलेले होते. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे रक्त नमुने बदलण्याचा घाट डॉक्टरांच्या सल्ल्याने घालण्यात आला. त्यादरम्यान ही बाब समोर आली. पुण्यामध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली.
19 मे 2024 रोजी पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या भीषण अपघातामध्ये अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने दोन तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील तरुण आणि तरुणीचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर अल्पवयीन मुलाला आधी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र त्यानंतर सामाजिक संघटना, राजकीय नेत्यांकडून निषेध नोंदवण्यात आल्यानंतर बालन्यायालय मंडळाने जामीन रद्द करत त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवलं. या मुलाच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत.
अपघात घडला त्या रात्री अल्पवयीन आरोपीचे वडील आणि भाऊ देखील दारू प्यायलेले होते. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे रक्त नमुने बदलण्याचा घाट डॉक्टरांच्या सल्ल्याने घालण्यात आला. त्यादरम्यान ही बाब समोर आली. पुण्यामध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली.
अल्पवयीन आरोपीने दारूच्या नशेत कार चालवून अपघात घडवला. आयटी इंजिनिअर असलेल्या तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन ससून हॉस्पिटलमध्ये रक्त नमुने देण्यासाठी नेण्यात आलं. मात्र त्याच्या रक्तात अल्कोहोलचा अंश आढळून येण्याची शक्यता असल्याने त्याच्या ऐवजी कुटुंबातील इतर कोणाचे तरी रक्त नमुने देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार आदी मुलाच्या वडिलांना फोन केला गेला. मात्र त्यांनी देखील दारू प्यायली असल्याच त्यांनी सांगितलं. त्यानंतर मुलाच्या भावाचे रक्त घेण्याबाबत विचारणा झाली. त्यावर भाऊ देखील पहाटे पाच पर्यंत दारू पीत होता असं समजलं. त्यामुळे अखेर मुलाच्या आईला बोलावण्यात आलं.
विशेष म्हणजे मुलाची आई देखील मद्य पशन करते. फक्त तिने दारू प्यायल्याला 24 तास उलटून गेले होते. तेव्हा तिच्या रक्तामध्ये अल्कोहोल आढळून येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे अखेर अल्पवयीन मुलाच्या जागी त्याच्या आईच रक्त घेतलं गेलं. अर्थात मुलाचे रक्त नमुने बदलण्यात आल्याचा संशय पोलिसांना आलाच होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने घेतले गेले. पुढील तपासात रक्त नमुने बदलण्याच्या प्रकाराचा पडदा फाश झाला. पुराव्यासोबत छेडछाड करणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांसह ससून मधील डॉक्टर आणि कर्मचारी मागील चार महिन्यापासून तुरुंगात आहेत.
दरम्यान, अल्पवयीन आरोपीच्या विरोधात बाल न्याय मंडळात दाखल खटल्यामध्ये पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात आल आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन आरोपीला अल्पवयीन न समजता प्रौढ समजून त्याच्यावरती खटला चालवण्यात यावा यासाठीचा अर्ध पोलिसांकडून द्याल न्यायमंडळामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. आता पुढील सुनावणी मध्ये आणखी काय काय समोर येतं त्यावर या खटल्याचं भवितव्य ठरणार आहे.