तुम्ही फेसबुक वापरणं बंद केलं तर तुमच्या डेटाचं काय होतं तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या माहिती

तुम्हाला तुमच्या सोईप्रमाणे काय करता येईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Updated: Oct 19, 2021, 12:49 PM IST
तुम्ही फेसबुक वापरणं बंद केलं तर तुमच्या डेटाचं काय होतं तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या माहिती

मुंबई : फेसबुकवरून दररोज फसवणुकीच्या बातम्या समोर येत राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही कधी विचार केला आहे की, जर तुम्ही हे अ‍ॅप वापरणे बंद केले तर अशा परिस्थितीत तुमचं काय होईल? आपल्याला सोशल मीडियाची इतकी सवय लागली आहे की, आपण त्याच्या शिवाय एक दिवस देखील राहू शकत नाही. जवळ जवळ एक दशकापासून लोकं फेसबुक वापरत आहेत. येथे लोकांना त्यांच्या जुन्या मित्रांना भेटता येते. त्यांच्यासोबत बोलता येते. फोटो-व्हिडीओपाहून स्वत:चे मनोरंजन करता येते.

तसेच फेसबुक आपल्याला वेळोवेळी काही गोष्टींची आठवण देखील करुन देत राहते. त्यामुळे आपल्याला ते वापरायला आवडते देखील. परंतु यासंदर्भात काही फसवणूकीच्या बातम्यांमुळे लोकांना या अ‍ॅपवर येण्यासाठी थोडी भिती वाटत आहे.

तसेच काही अन्य कारणांमुळे देखील लोकं सोशल मीडियापासून लांब राहू इच्छीतात. परंतु अशावेळी काय करावे हे त्यांना कळत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यापासून लांब जाण्यासाठी फेसबूकडील दोन पर्याय सांगणार आहोत.

तुम्हाला तुमच्या सोईप्रमाणे काय करता येईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणे करुन तुम्हाला पर्याय निवडणे सोपे होईल.

अ‍ॅपपासून लांब कसे राहता येईल?

कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीच्या पत्रकारिता आणि मीडिया कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक मायकल हम्फ्रे यांनी सांगितले की, हे अॅप वापरणे तुम्हाला थांबवायचे असेल तर त्याचे दोन मार्ग आहेत - ते म्हणजे त्याला निष्क्रिय म्हणजे डिएक्टिवेट करणे किंवा हटवणे म्हणजेच डिलिट करणे.

जेव्हा तुम्ही फेसबुक डिएक्टिवेट करता, तेव्हा हे खाते एका प्रकारे निलंबित केले जाते. याचा अर्थ असा की, आपण या अॅपवर जे काही केले आहे ते एकतर काढले जाईल किंवा अनुपलब्ध (Unavailable) होईल. जर एखाद्या दिवशी तुम्ही ते पुन्हा सक्रिय केले तर ते सर्व परत आपल्याला उपलब्ध होईल.

त्याच वेळी, खाते हटवण्याचा किंवा डिलिट करण्याचा अर्थ असा होईल की, आपले प्रोफाईल, फोटो, पोस्ट, व्हिडीओ आणि आपण त्यात जे काही जोडले आहे ते कायमचे हटवले जाईल. फेसबुकच्या मते, तुम्हाला यापैकी काहीही परत मिळू शकणार नाही.

फेसबुक सोडण्यापूर्वी सर्व डेटा सेव्ह करा

अशा परिस्थितीत, आपल्या सर्व संस्मरणीय गोष्टी पूर्णपणे हटवण्यापूर्वी जतन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे माहिती डाउनलोड करणे. मायकेल हम्फ्रे यांच्या मते, "तुम्ही हे एका कालावधीत एकदा केले पाहिजे कारण हे दर्शविते की, तुमचे निरीक्षण कसे केले जात आहे, तुम्ही हे माध्यम अॅपवर कसे वापरत आहात आणि वर्षानुवर्षे तुम्ही साइटवर कोणत्या प्रकारचे उपक्रम केले आहेत"

डाउनलोड केलेल्या डेटासोबत काय केले जाऊ शकते?

अकाउंट डिलीट झाल्यावर, तुमचा डाउनलोड केलेला डेटा कॉन्टॅक्टलेस होतो. याचा अर्थ असा की, आपल्या पोस्ट्स तारीख आणि वेळेनुसार येतात, परंतु त्या कोणत्याही प्रतिक्रिया दर्शवत नाहीत.

फोटो आणि व्हिडीओच्या बाबतीतही असेच आहे. आपण इतर लोकांच्या पोस्टवर केलेल्या कमेंट्स देखील कोणाला दिसणार नाहीत. जर तुम्ही मतदानाच्या संदर्भात कोणाला किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुमचं मत दिलं असेल, तरी देखील तुम्हाला त्या मतदानाची माहिती मिळणार नाही, फक्त उत्तरे मिळतील.

तसेच अ‍ॅप आपण ज्या लोकांशी संवाद साधला आहे त्यांचे फक्त नाव, तारीख आणि वेळ सूचीबद्ध करते. जर तुम्ही एखाद्याशी मेसेजद्वारे बोललो असाल तर तुम्ही तुमच्या गप्पा पाहू शकता.