सावधान! Whatsapp मधून घुसतोय malware व्हायरस

Whatsappवर एक मेसेज फिरत आहे. या मेसेजमधून Worm नावाचा व्हायरस आपल्या फोनमध्ये शिरकाव करत आहे.

Updated: Jan 30, 2021, 04:37 PM IST
सावधान! Whatsapp मधून घुसतोय malware व्हायरस title=

नवी दिल्ली: बोलण्यापासून ते अगदी ऑफिसच्या कामापर्यंत whatsapp आपला आधार बनला आहे. अगदी महत्त्वाची कागदपत्र ते फोटो पाठवण्यापर्यंत whatsapp आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या अॅपमध्ये आपला काही खासगी, महत्त्वाचा डेटा सेव्ह असतो. आता त्या डेटापर्यंत हॅकर्स पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आपलं Whatsapp खूप सिक्युअर करणं गरजेचं आहे. 

Whatsappवर एक मेसेज फिरत आहे. या मेसेजमधून Worm नावाचा व्हायरस आपल्या फोनमध्ये शिरकाव करत आहे. हा मेसेज चुकून जर तुम्ही कुठल्या ग्रूप किंवा मित्र-मैत्रीणींना पाठवला तर त्याच्याही फोनला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 
 
जर हा मालवेयर आपल्या फोनमध्ये आला असेल तर जे लोक तुम्हाला मेसेज करतील त्यांना देखील आपोआप मेसेज रिप्लाय स्वरुपात जाईल. थोडक्यात सांगायचं तर Whatsappवर ऑटोरिप्लाय केला जाईल. एका सिक्युरिटी रिसर्चनं व्हिडीओच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. 

सिक्यॉरिटी फर्म ESET यांनी दिलेल्या माहितीनुसार जर मालवेअर व्हायरस असलेल्या फोनमध्ये Whatsapp मेसेज आले तर त्यांना आपोआप रिप्लाय दिेले जात आहेत. हे त्या व्हायरसमुळे होत आहे. मेसेजमध्ये गुगल प्ले पेजची एक फेक लिंक दिली जाते. त्यावरून एक अॅप डाऊनलोड करायला सांगितलं जातं. एका तासात एका युझरला एक लिंक पाठवली जाते. 

लोकांना फसवून पैसे कमवण्याच्या हेतूनं हे अॅप डिझाइन करण्यात आलं आहे. त्यातून व्हायरस लोकांच्या फोनमध्ये सोडला जात आहे. तर एका युझरनं दिलेल्या माहितीनुसार डुप्लिकेट अॅप किंवा फेक अॅप पेज करून देखील असे प्रकार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मालवेअर व्हायरसपासून कसं सावध राहाल?
आपल्या फोनमध्ये अनोळखी अॅप्स म्हणजेच Unknown Appsची परवानगी देऊ नका. त्यामुळे Unknown Apps डाऊनलोड करताना फोन दरवेळी परवानगी मागेल. त्यामुळे आपल्या फोनमध्ये व्हायरस येण्यापासूनचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्या फोनमध्ये एक बदल अजूनही केला नसेल तर लगेच करा. 

फोनच्या सेटिंगमध्ये जा Settings तिथून Apps पर्याय निवडा आणि Special Access वर क्लिक द्या. त्य़ानंतर Install Unknown Apps हा पर्याय असेल. तिथे आपण परवागी न देण्यावर क्लिक करा. त्यामुळे अनोळखी अॅपला आपल्या फोनमध्ये प्रवेश मिळणार नाही. 

त्याशिवाय आपण सिक्युरिटी ऑपशनमध्ये जाऊन Unknown Sources पर्याय बंद करून टाका. याशिवाय एखाद्या अॅन्टीव्हायरस अॅपचा वापर करून आपण या व्हायरसला आपल्या फोनमध्ये येण्यापासून रोखू शकता.