OMG! चालता फिरता हवेतच मोबाईल चार्ज होणार?

आता हवेत चार्जिंग होणार? कसं आणि काय आहे टेक्नोलॉजी वाचा सविस्तर

Updated: Jan 29, 2021, 03:04 PM IST
OMG! चालता फिरता हवेतच मोबाईल चार्ज होणार? title=

मुंबई: नवीन मोबाईल खरेदी करताना आपण मोबाईलची बॅटरी किती चालेल हे आधी पाहातो. तो किती वेगानं चार्ज होणार आणि किती वेळ टिकणार हे महत्त्वाचं असतं. प्रत्येकवेळी चार्जिंग पॉइंट असेलच याची खात्री नसते त्यामुळे चार्जिंग उतरण्याचं टेन्शनही असतं.

आता हेच टेन्शऩ दूर होणार आहे. कारण ना चार्जर घेऊन फिरण्याची कटकट ना चार्जिंग उतरण्याची. हवा तेव्हा हव तिथे आता चार्जिंग करता येणार आहे. चार्जिंगसाठी एक नवीन तंत्रज्ञान लवकरच येत आहे. त्याला एअर चार्ज टेक्नॉलॉजी असंही म्हटलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण चार्जिंग वायर किंवा डॉकवर मोबाईल न लावता चार्ज करता येणार आहे. 

थोडक्यात सांगायचं तर हवेतून मोबाईल चार्ज होणार आहे. किती अजब वाटतं आहे ना? पण होय असं एक तंत्रज्ञान सध्या विकसित केलं जात आहे. चायना मोबाइल तयार करणाऱ्या शाओमी कंपनीने यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 

एमआय एअर चार्ज (MI Air Charge Technology) तंत्रज्ञान लवकरच आणणार असल्याचा खुलासा शाओमीनं आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे. 

स्पेस पोजिशनिंग आणि एनर्जी ट्रान्समिशनचा वापर करण्यात आल्याचे ब्लॉगमध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये 5-फेज अँटेनाच्या मदतीनं आपला फोन कुठे आहे ते शोधू शकणार आहे. या अॅन्टीनाच्या संपर्कात फोन आल्यानंतर फोन चार्ज होऊ शकतो. 

शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, घरात एक यूपीएस-आकाराचा डॉक बसवावा लागेल. या डॉकवरून एक सिग्नल पाठवण्यात येईल. मोबाईल या डॉकच्या संपर्कात येताच चार्ज होण्यास सुरुवात होईल.

अॅपल कंपनीने नुकताच वायरलेस चार्जिंग बाजारात आणलं आहे. वायरलेस चार्जिंगची सुविधा केवळ iPhone 12 मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये एक डॉक देण्यात आला आहे. त्यावर ठेवल्यानंतर मोबाईल चार्ज होतो अशी माहिती मिळाली आहे. याच टेक्नोलॉजीला पुढे घेऊन जात आता वायरलेस चार्जिंग या संकल्पनेवर सध्या काम सुरू आहे.