WhatsApp: व्हॉट्सअॅप वापरतं नाही असा आज एकही यूजर आपल्याला सापडणार नाही. मेसेजिंग अॅपमध्ये WhatsApp सगळ्या लोकप्रिय अॅप आहे. या अॅपशिवाय आता मार्केटमध्ये अजून अनेक अॅप आले आहेत. त्यातील एक महत्त्वाचं नाव आहे, Telegram. सध्या मार्केटमध्ये WhatsApp विरुद्ध Telegram असा संघर्ष दिसून येतं आहे. त्यामुळे WhatsApp यूजर्ससाठी मोठी बातमी आहे. Telegram चे संस्थापक यांनी WhatsApp पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह (Pavel Durov) यांनी व्हॉट्सअॅपवर धक्कादायक आरोप केला आहे. पावेल दुरोव्ह यांच्या मते व्हॉट्सअॅप युजर्सच्या फोनमधील कोणत्याही गोष्टीवर अॅक्सेस मिळवण्यास हॅकर्स सक्षम आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी युजर्सना व्हॉट्सअॅपपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे. (whatsapp vs telegram Stay away from WhatsApp warns Telegram founder nmp)
यावेळी त्यांनी हाही सल्ला दिला आहे की, 'मी लोकांनी टेलिग्राम वापरावे असं म्हणत नाही. तुम्ही कोणतेही मेसेजिंग अॅप वापरा, मात्र व्हॉट्सअॅपपासून दूर राहा.'
'व्हॉट्सअॅपवर केवळ एक द्वेषयुक्त व्हिडिओ पाठवून किंवा तुमच्यासह व्हिडिओ कॉल सुरू करून हॅकर्स तुमच्या फोनवर नियंत्रण मिळवू शकतात.' यापूर्वीही 2017, 2018, 2019 आणि 2020 साली अशा घटना समोर आल्या होत्या, अशी माहिती टेलिग्राममधील एका पोस्टमध्ये दुरोव्ह यांनी दिली आहे.