रोज 1GB डेटा मिळणारा कोणता प्लॅन आहे सर्वात चांगला...

टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी अलिकडेच नवीन प्लॅन सादर केला.

Updated: Mar 30, 2018, 01:32 PM IST
रोज 1GB डेटा मिळणारा कोणता प्लॅन आहे सर्वात चांगला... title=

मुंबई : टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी अलिकडेच नवीन प्लॅन सादर केला. या प्लॅनची किंमत आहे 65 रुपये. यात युजर्संना 1GB डेटासोबत 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. या प्लॅनला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओ, आयडिया आणि वोडाफोनचे प्लॅन्स देखील बाजारात उपलब्ध आहेत. 
तर पाहुया कोणता प्लॅन आहे अधिक चांगला...

एअरटेल

49 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युजर्संना 3G/4G चा डेटा 28 दिवसांसाठी मिळत आहे. मात्र ही ऑफर फक्त काहीच युजर्ससाठी उपलब्ध़ आहे. 49 रुपयांचा 1 दिवसाचा व्हॅलिडीटी असलेला प्लॅन देखील उपलब्ध आहे. यात तुम्हाला 1GB डेटा मिळेल.

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओच्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्संना फ्री व्हॉईस कॉलिंग आणि 1GB 4G डेटा 28 दिवसांसाठी मिळत आहे. यात युजर्सला 50 फ्री एसएमएस देखील मिळत आहेत. हा प्लॅन फक्त जिओ युजर्ससाठी उपलब्ध आहे.

रिलायन्स जिओचा 98 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिडेट व्हॉईस कॉल्स आणि 2GB 4G डेटा मिळेल. याची देखील व्हॅलिटीडी 28 दिवसांची असणार आहे. हा प्लॅन जिओच्या सर्व प्रीपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे. यात युजर्संना 300 फ्री एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रीप्शन मिळेल.

आयडिया

आयडियाच्या 65 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्संना लोकेशननुसार 1GB 4G/2G डेटा मिळेल. याची व्हॅलिटीडी 15 दिवसांची असेल. त्याचबरोबर 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1GB डेटा 28 दिवसांच्या व्हॅलिटीडीसहित मिळेल.

वोडाफोन

वोडाफोनच्या या प्लॅनमध्ये 1GB 4GB डेटा 28 दिवसांसाठी मिळत आहे. यात अनलिमिडेट कॉल्स आणि एसएमएसची सुविधा मिळत आहे. 
आता या सर्व प्लॅन्सची तुलना करुन तुम्ही यातील तुमच्यासाठी उत्तम अशा प्लॅनची निवड करु शकता.