भारतात मोबाईल नंबरच्या आधी +91 कोड का लागतो? जाणून घ्या!

भारताला +91 कोड का? माहित आहे का

पोपट पिटेकर | Updated: Nov 4, 2022, 09:02 PM IST
भारतात मोबाईल नंबरच्या आधी +91 कोड का लागतो? जाणून घ्या! title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : कोणत्याही भारतीय फोन (Indian phone) नंबरच्या आधी आपल्याला +91 हा कोड नंबर (code no) येतो. तसं पाहिलं तर हा कोड ऑटोमेटिकच कॉल्स दरम्यान लागतो. बऱ्याच जणांना याबाबतची माहिती असेलच, कारण हा देशाचा कोड आहे. भारताचा कोड +91 (Code of India) आहे. हा कोड भारताचा असला तरी हाच कोड का येतो? कंट्री कॉलिंग कोड (Country Calling Code) कसे ठरवले जातात आणि ते कोण ठरवतं. यासाठी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (International Telecommunication Union) म्हणजे काय? इंटरनॅशनल डायरेक्ट डायलिंग (International Direct Dialing) म्हणजे काय? या सर्वांची माहिती चला जाणून घेऊयात.

काय आहे इंटरनेशनल टेलीकम्युनिकेशन यूनियन
देश कॉलिंग कोड (Country calling code) किंवा देश डायल-इन कोड टेलिफोन नंबरच्या पुढे वापरले जातात. याच्या मदतीने इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) चे सदस्य किंवा या प्रदेशातील टेलिफोन ग्राहक जोडले जाऊ शकतात. भारतासाठी हा कोड +91 आहे. तर पाकिस्तानचा (Pakistan) डायल कोड +92 आहे. या कोडना आंतरराष्ट्रीय सदस्य डायलिंग असेही म्हणतात. 

इंटरनेशनल टेलीकम्युनिकेशन यूनियनचं काम
ITU म्हणजेच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ही एक विशेष एजन्सी आहे, जी संयुक्त राष्ट्रांचा भाग आहे. ही एजन्सी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाशी (Information and Communication Technology) संबंधित समस्यांवर काम करते. 17 मे 1865 रोजी इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन (International Telegraph Union) म्हणून त्याची स्थापना झाली. त्याचं मुख्यालय जिनिव्हा (Headquarters Geneva) येथे आहे. एकूण 193 देश या संघाचा भाग आहेत. देशाचा कोड देणे हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. म्हणजेच या एजन्सीने भारताला +91 कोड दिला आहे.

कोडचा वापर कधी ?
देश कोड हे आंतरराष्ट्रीय टेलिफोन नंबरिंग (International telephone numbering) योजनेचा भाग आहेत. ते एका देशातून दुसऱ्या देशात कॉल करताना वापरले जातात. देशात हा कोड ऑटोमॅटिक असल्याचे दिसतं. परंतु तुम्हाला आंतरराष्ट्रीय नंबर डायल करण्यासाठी हा कोड वापरावा लागतो. म्हणजेच, जेव्हा तुम्ही तुमच्याच देशातील दुसऱ्या स्थानिक वापरकर्त्याला कॉल करता तेव्हा हा कोड आपोआप लागू होतो. पण इंटरनेट कॉलमध्ये (Internet calls) तुम्हाला हा कोड वेगळा वापरावा लागतो. कोणत्या देशाला कोणता कोड मिळेल, हे त्यांच्या झोन (zone) आणि झोनमधील त्यांची संख्या यांच्या आधारे ठरवले जाते.

भारताला +91 कोड का ?
भारत हा 9व्या झोनचा भाग (India is part of 9th zone) आहे, ज्यामध्ये मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातील देशांचा समावेश आहे. येथे भारताला 1 कोड मिळाला आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय डायलिंग कोड (International dialing code) +91 आहे. तर तुर्कीचा कोड +90, पाकिस्तानचा +92, अफगाणिस्तानचा +93, श्रीलंकेचा +94 आहे.