नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपन्यांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असल्याने याचा फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे. सर्व स्मार्टफोन कंपनी कमीत कमी दरात नवनवे फिचर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. यामध्ये या स्मार्टफोनने बाजी मारली आहे.
शाओमीच्या रेडमी नोट ४ हॅंडसेटने विक्रीमध्ये सर्वांना मागे टाकले आहे. ६ महिन्यात (२३ जाने ते २३ जुलै दरम्यान) ५० लाख ग्राहकांनी रेडमी नोट ४ घेतला आहे. सर्वाधिक विक्री झालेल्या मोबाईल्सच्या यादीत याचाही नंबर लागला आहे.. गेल्यावर्षी सॅमसंग जे २ ची पहिल्या ६ महिन्यात ३३ लाख हॅंडसेटची विक्री झाली होती.
या कंपनीने देशात ऑफलाइन बाजारातही आपल्या स्मार्टफोनची विक्री वाढविण्याचे जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यांनी एमआय होम सिग्नेचर स्टोअर दिल्लीतील एनसीआर क्षेत्रात खोलण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याआधी शाओमीने बंगळूरमध्ये २ एमआय स्टोर उघडले आहेत.
दिल्ली-एनसीआरमध्ये लवकरच एमआय स्टोअर सुरू होत आहे. पुढच्या काही आठवड्यात याची निश्चित तारीख सांगण्यात येईल असे शाओमी इंडियाचे प्रबंध निर्देशक आणि शाओमी उपध्यक्ष मनु कुमार जैन यांनी सांगितले.
शाओमी रेडमी नोट ४ डिवाइसच्या रेकॉर्डतोड विक्रीच्या आनंदात दिल्लीतील त्यागराज स्टेडिअममध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शाओमीच्या या सोहळ्याला महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राज, माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.