Year Ender : 2017 मध्ये भारतात 'या' कार झाल्या लाँच

कार ही आता प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 26, 2017, 05:48 PM IST
Year Ender : 2017 मध्ये भारतात 'या' कार झाल्या लाँच  title=

मुंबई : कार ही आता प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक.

हल्ली ऑटोमोबाईल हे सेक्टरच लोकप्रिय होताना दिसत आहे. प्रत्येकाला आपल्या दारी एक हक्काची चारचाकी असावी असं वाटतं असतं. आणि अशातच 2017 हे वर्ष भारतासाठी खास ठरलेलं आहे. आणि याचं कारण म्हणजे 2017 मध्ये भारतात अनेक गाड्या लाँच झाल्या. आज इअर एंडरला आपण अशाच गाड्या पाहणार आहोत ज्यांनी भारतात धुमाकूळ घातला. इअर एंडरला ही स्पेशल स्टोरी.... 

मारूती सुझूकी डिझाइर 

ही कार सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक विकणारी म्हणून नोंदवली गेली. या कारने विक्रीत मारूती ऑल्टोला देखील पाठी टाकलं आहे. ही कार 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीट डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार पेट्रोल वर्झन 22 किमीपरलीटर तर डिझेल वर्झन 28.4 किमीपरलीटर माइलेज देते. या कारची किंमत 5.9 लाख रुपयांपासून सुरू होते. 

रेनॉल्ट कॅप्चर 

रेनो कॅप्चरमध्ये डस्टरप्रमाणेच 1.5 ली पेट्रोल आणि 1.5 ली डिझेलचे इंजिन देण्यात आले आहे. या शानदार एसयूवीची किंमत 9.99 लाख रुपये असून कॅप्चरमध्ये तुम्हाला फूल एलईडी हेडलँप, कॉन्ट्रक्ट रूफ, डुअल टोन इंटिरिअर आणि 7.0 इंच टच स्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम सारखे फिचर देण्यात आले आहेत. 

टाटा नेक्सॉन 

या कारची किंमत 5.85 लाखापासून ते अगदी 9.45 लाख रुपये इतकी आहे. याकारमध्ये 1,198 सीसी, तीन सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1,497 सीसी, चार सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन डिझेलमध्ये देण्यात आले आहेत.

मारूती सुझकी इग्निस 

या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. पेट्रोल इंजिन 20 आणि डिझेल इंजिन 26.8 किमीपरलीटर माइलेज देत आहे. या कारची किंमत 4.56 लाख रुपये इतकी आहे. 

जीप कंपास 

जीप ही अमेरिकन कंपनी आहे. मात्र याच्या कंपास कारची भारतातच निर्मिती करण्यात आली आहे. तसेच परदेशात देखील हीच कार पाठवली जाते. जीप कंपास ही कार देशातील बेस्ट एसयूवी कारपैकी एक आहे. या कारची किंमत 19.41 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 1368सीसी पेट्रोल आणि 1956 सीसी डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. 

लम्बोर्घिनी अॅडव्हेंटाडोर एस रोडस्टर

ही इटालियन कंपनीची कार भारतात दाखल झाली आहे. याची किंमत ऐकून सामान्य माणूस नक्कीच थक्क होईल, ती आहे ५ कोटी ७९ लाख इतकी आहे. या गाडीला दोनच पॅनेल असून मॅट कार्बन आणि फायबरमध्ये याचे रुफ तयार करण्यात आले आहे, त्यामुळे त्याचे वजनही अतिशय कमी म्हणजे १२ किलो इकतेच आहे. ही स्पोर्ट्सकार इतकी वेगवान आहे की ती ० ते १०० वेगासाठी ३ सेकंद इतका कमी वेळ घेते.

 फेरारी जीटीसी ४ लूसो आणि जीटीसी ४ लूसो टी

या दोन्हीही इटालियन कंपनीच्या स्पोर्टस कार आहेत. यातील GTC4 Lusso T ही गाडी भारतात ५ कोटी २ लाख रुपयांना तर GTC4 Lusso ही गाडी ४ कोटी २ लाखांना खरेदी करता येते. या गाड्यांचे इंजिन ६२६२ सीसीचे असून ती घोड्याच्या वेगाने धावते. ३.४ सेकंदामध्ये ही गाडी ताशी १०० किलोमीटर या वेगाने धावते. याचा सर्वाधिक वेग ३३५ ताशी किलोमीटर आहे.

 रेंज रोव्हर एसव्हीऑटोबायोग्राफी बेसपोक

ही गाडी ब्रिटीश बनावटीची असून भारतात ती २ कोटी ८ लाखांना उपलब्ध आहे. यामध्ये ४.४ लीटरचे डिझेल इंजिन आहे जे ३४० इतकी पॉवर देते. त्याचबरोबर ५ लीटरचे पेट्रोल इंजिन आहे जे ५५० पॉवर देते. विशेष म्हणजे कंपनीने या गाडीची केवळ ५ मॉडेल विक्रीसाठी भारतात उपलब्ध केली आहेत

जॅग्वार एफ-टाइप एसव्हीआर

यामध्ये दोन लोक बसू शकतील आणि ४ जण बसू शकतील असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यातील पहिल्या प्रकाराची किंमत २ कोटी ४८ लाख इतकी असून दुसऱ्या प्रकाराची किंमत २ कोटी ६२ लाख इतकी आहे. कंपनीने आतारपर्यंत तयार केलेल्या कारपैकी SVR या सर्वाधिक पॉवरच्या कार आहेत. यामध्ये ५ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून याचा वेग ताशी ३२२ पर्यंत जाऊ शकतो.