Whatsapp Tips And Tricks: सध्याच्या काळात प्रत्येकाला व्हॉट्सअॅप हे मेसेंजिंग अॅप परिचयाचं आहे. संपूर्ण जगात या अॅपचा सर्वाधिक वापर केला. या माध्यमातून संवाद साधणं सर्वात सोपं आहे. त्यामुळे एकदा मोबाईलमध्ये फोन नंबर सेव्ह केला की, अॅपच्या माध्यमातून संवाद सुरु होतो. फोटो, व्हिडीओ, ऑडीओ मेसेड पाठवणं सोपं आहे. व्हॉट्सअॅपने काळानुरूप अनेक बदल केले आहेत. आतापर्यंत युजर्स फ्रेंडली अनेक फीचर्सची भर घातली आहे. पण असं असलं तरी या अॅपमधील अनेक फीचर्सबाबत काही जण अनभिज्ञ आहेत. तुम्ही व्हॉट्सअॅप न उघडता काही सेकंदात कोणालाही मेसेज करू शकता, हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत. तुम्हाला मेसेज पाठवायला फार कष्टही करावे लागणार नाहीत. चला जाणून घेऊया या ट्रिकबद्दल...
व्हॉट्सअॅपवर असे अनेक शॉर्टकट आहेत, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅप न उघडताही कोणालाही मेसेज पाठवू शकता. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि समोरच्या व्यक्तीपर्यंत लवकर मेसेज पोहोचेल. मेसेज पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅप ओपन करण्यासाठी वेळ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही या युक्तीने अॅप न उघडताही पाठवू शकता.
जाणून घ्या सोप्या टिप्स
-सर्व प्रथम, आपण ज्या व्यक्तीशी जास्त बोलता त्या व्यक्तीचा शोध घ्या. तुम्ही त्यांना चॅट स्क्रीनवर जोडू शकता.
-तुम्हाला ज्या व्यक्तीला होम स्क्रीनवर आणायचे आहे त्याचा चॅट बॉक्स उघडा.
-चॅट बॉक्स उघडताच तुम्हाला उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील. क्लिक केल्यावर तुम्हाला अॅड चॅट शॉर्टकटचा पर्याय दिसेल.
-अॅड चॅट शॉर्टकटवर क्लिक केल्यावर फोनच्या होम स्क्रीनवर चॅट बॉक्स जोडला जाईल.
-त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅप न उघडताही त्या व्यक्तीशी संवाद साधू शकता.