Akshay-Ajay On Actors High Fees: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगन हे त्यांच्या 'सिंघम अगेन' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अजय देवगन या चित्रपटात सिंघमच्या भूमिकेत दिसला. तर अक्षय कुमारने या चित्रपटात कॅमिओ केला आहे. अशातच आता अक्षय कुमार आणि अजय देवगन यांनी सध्या कलाकारांना मिळत असणाऱ्या चित्रपटाच्या मानधनाबाबत एक खुलासा केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमारने कधी-कधी एखादा चित्रपट फ्लॉप झाले तर फी मिळत नाही असं म्हटलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार आणि अजय देवगन यांना विचारले होते की, सध्या चित्रपटाचे बजेट खूपच वाढत असल्याचं दिसत आहे. त्यावर अजय देवगन म्हणाला की, कलाकार हा स्क्रिप्ट, चित्रपट आणि प्रोजेक्टनुसार हा त्याचे मानधन घेत असतो. पण जास्तीत जास्त कलाकार हे चित्रपटाच्या एकूण कमाई झाल्यानंतर फी घेतात.
आम्हाला पैसे मिळत नाहीत
यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने देखील या प्रश्नावर दिलखुलास उत्तर दिलं. तो म्हणाला की, अजय देवगन जो काही म्हणाला त्याच्याशी मी सहमत आहे. आज आम्ही एखादा चित्रपट साईन केला तर आम्ही त्या चित्रपटाची फी घेत नाही. तर आम्ही शेअर्स घेतो. ज्यामध्ये तो चित्रपट हिट झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. तर त्या चित्रपटाच्या नफ्यातून आम्ही पैसे घेतो. मात्र, जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही तर त्याचे पैसे आम्हाला मिळत नाहीत. त्यानंतर अजय देवगन म्हणाला की, कधी कधी शेअरही मिळत नाही. मग आम्हाला मान देखील सोडून द्यावे लागते.
'सिंघम अगेन' चित्रपटाची कमाई
रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 200 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात अजय देवगनसह अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर आणि टाइगर श्रॉफ हे कलाकार आहेत. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चा सुरु आहे.