इन्स्टाग्रामवर पैसे कमवायचे आहेत मग करा 'या' गोष्टी...

 Instagramवर अधिक फॉलोअर्सची संख्या तुम्ही कशी वाढवू शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Updated: Jul 26, 2022, 02:11 PM IST
इन्स्टाग्रामवर पैसे कमवायचे आहेत मग करा 'या' गोष्टी... title=

Instagram Followers : सध्याच्या जमाना हा सोशल मीडियाचा आहे. इंटरनेटच्या आगमनानंतर माहिती क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या क्रांतीनंतर जगातील अनेक लोक आज व्हर्च्युअल जगात जगतो आहे. सोशल मीडियाने एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अनेक डिजिटल इकोसिस्टम तयार केली आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबसारखे मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही रोज वापरत असता. यातील Instagram आजकाल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आहे. 

Instagram हे केवळ फोटो शेअरिंग अॅप नसून यावर तुम्ही पैसेही कमवू शकतात. त्यासाठी तुम्हाला Instagramवर लाखो फॉलोअर्सची गरज असेत. तर Instagramवर अधिक फॉलोअर्सची संख्या तुम्ही कशी वाढवू शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हॅशटॅग

पहिले तर तुम्ही इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय राहिला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इन्स्टाग्राम रील्स तयार करावे लागतील. या रील्समधून तुला पैसे कमवण्यासाठी मदत होते. पण यासाठी तुमचे इंस्टाग्राम अधिक फॉलोअर्स असणे महत्त्वाचे आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही काही पोस्ट टाकणार असाल तर त्या संबंधित हॅशटॅग वापरणे गरजेचे आहे. तुम्ही कायम ट्रेंडिंग विषयावर रील्स तयार करा म्हणजे तुम्हाला त्यासंबंधी हॅशटॅग मिळतील. या हॅशटॅगमुळे तुमची पोस्ट व्हायरल होऊ शकते आणि याचा फायदा म्हणजे तुमचे फॉलोअर्स वाढतात. अजून महत्त्वाचं पोस्ट टाकताना कायम लक्षवेधी आणि आकर्षक कॅप्शन द्या. 

कंटेंट क्वालिटी

इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही शेअर करणार असलेल्या गोष्टीमध्ये कंटेंट क्वालिटी असणे महत्त्वाचे आहे. कंटेंट क्वालिटी चांगली असेल तर ते तुमचं लक्ष वेधून घेतात. तसंच तुमच्या मजकूरचा दर्जा पण चांगला असावा. तसाच तो वेगळा असेल याचा प्रयत्न करा. 

पोस्टवर रिएक्ट

Instagram असो किंवा  फेसबुक बऱ्याच लोकांची सवय असते पोस्टवर प्रतिक्रिया देत नाहीत. तसंच त्यांच्या स्वतःच्या पोस्टवरील टिप्पण्यांना उत्तर देत नाहीत.  जर अशी सवय तुमची पण असेल तर पहिली ती सोडा. कारण यूजर्संना गुंतवूण ठेवण्यासाछी वेळोवेळी तुम्हाला टिप्पण्यांना उत्तर द्यावे लागेल. 

रेगुलर एक्टिव राहा

इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर जर तुम्ही बराच काळ या प्लॅटफॉर्म जात नाही, तर ही सवय त्वरित सोडून टाका. इन्स्टाग्रामवर जर तुम्हाला फॉलोअर्सची संख्या वाढवायची असेल तर, तुम्ही नियमित कंटेंट पोस्ट करत राहणे खूप महत्त्वाचे आहे.