स्वस्तात मस्त! डोंगराळ रस्ता असो की चिखल 'या' अ‍ॅडव्हेंचर्स बाइक काढतात मार्ग

भारतीय बाजारात खिशाला परवडणाऱ्या किंमती 5 बाइक उपलब्ध आहेत.

Updated: Jul 26, 2022, 12:57 PM IST
स्वस्तात मस्त! डोंगराळ रस्ता असो की चिखल 'या' अ‍ॅडव्हेंचर्स बाइक काढतात मार्ग title=

Affordable Adventure Bikes In India: अ‍ॅडव्हेंचर्स बाइकबाबत कायमच बाइकप्रेमींमध्ये उत्सुकता असते. कारण खडतर मार्गावर या बाइक आपला मार्ग सहज काढतात. डोंगराळ रस्ता किंवा चिखलातून या गाड्या न अडकता मार्गस्थ होतात. त्यामुळे ऑफ-रोडिंग करणाऱ्यांसाठी अ‍ॅडव्हेंचर्स मोटारसायकल पहिली पसंती असते. असं असलं तरी या बाइकची किंमत ऐकून पावलं मागे वळतात. पण आज आम्ही तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या अ‍ॅडव्हेंचर्स मोटारसायकलबाबत सांगणार आहोत. भारतीय बाजारात 5 बाइक उपलब्ध आहेत, चला तर मग जाणून घेऊयात या बाइकबाबत.

Hero Xpulse 200: हिरो एक्सपल्स 200 ही गाडी 1.27 लाख (एक्स शोरुम) किमतीत उपलब्ध आहे. या गाडीत 200 सीसी सिंगल सिलेंडर, ऑइल कूल्ड इंजन आहे. या गाडीचं पुढचं चाक 21 इंचाचं असून मागील चाक 18 इंचाचं आहे. यात स्पोक व्हील देण्यात आले आहेत. या गाडीचं ग्राउंड क्लियरन्स 220 मिमी आहे.

Honda CB200X: होंडा सीव्ही 200 एक्स ही गाडी 1.48 लाख (एक्स शोरुम) या किमतीत उपलब्ध आहे. यात 184.4 सीसी, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 17 बीएचपी पॉवर आणि 16.1 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाइकमध्ये एलईडी हेडलँप, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इंजन काउल आणि गोल्डन यूएसडी फोर्क्ससारखे फीचर्स आहेत. 

Royal Enfield Himalayan: रॉयल एनफील्ड हिमालय ही गाडी 2.15 लाख (एक्स शोरूम) या किमतीत उपलब्ध आहे. यात 411 सीसीचं इंजिन आहे. हे खूप पॉवरफूल इंजिन आहे. या गाडीचं पुढचं चाक 21 इंचाचं आहे. यात स्विचेबल रीयर एबीएस दिलं आहे. बाइकचं ग्राउंड क्लियरेंस 220 मिमी आहे.

Yezdi Adventure: येज्डी अ‍ॅडव्हेंचर 2.13 लाख (एक्स शोरुम) किमतीत उपलब्ध आहे. यात 334 सीसी इंजिन असून बाइकचं वजन 188 किग्रॅ आहे. यात डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनल दिलं आहे. विजिबिलिटीसाठी वाकवलं जाऊ शकतं. या गाडीला 15.5 लीटरचं फ्यूल टँक दिलं असून तीन रंगात उपलब्ध आहे.

KTM 250 Adventure: केटीएम 250 अ‍ॅडव्हेंचर ही गाडी 2.44 लाख (एक्स शोरुम) या किमतीत आहे. यात 248.76 सीसी, लिक्विड कूल्ड इंजिन दिलं आहे. हे इंजिन 29.5 बीएचपी पॉवर आणि 24 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6 स्पीड गिअरबॉक्ससह येते.