नवी दिल्ली: यूट्यूब (YouTube)हे सध्याचे सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंटरनेटवर युट्यूब पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. युट्यूबने आपल्या वापरकर्त्यांसाठी सध्या एक फिचर हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हिडिओ बनवणाऱ्यांना मोठा फायदा होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.
द वर्जच्या (The Verge) एका वृत्तानुसार, डिसलाईकचे (Dislike) बटण यूट्यूबवरून (YouTube) काढले जाऊ शकते. कंपनीने यासाठी तयारी केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे बटण हटविल्यामुळे यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना थेट फायदा होईल. यूट्यूबनेही या संदर्भात ट्विट केले आहे.
प्रत्येक व्हिडीओच्याखाली Like, Dislike, Share आणि Download असे पर्याय होते. या टूल्समुळे आपला व्हिडीओ किती जणांना आवडला, नाही आवडला हे क्रिएटर्सला कळते. डिसलाईकचे बटण हे थेट फि़डबॅक देते. युट्यूबने केवळ फीडबॅकसाठी लाइक आणि नापसंत यासारखे बटणे तयार केली होती पण डिसलाईक बटणाचा गैरवापर होताना दिसतोय. . युजर्स एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लक्ष्य करण्यासाठी हे बटण वापरु लागले आहेत. डिसलाईकचे बटण हे विरोध दर्शवण्याच साधन म्हणून वापरलं जाऊ लागलंय.
डिसलाईक बटण काढल्यामुळे व्हिडिओ निर्मात्यांना त्याचा फायदा होईल. निर्मात्यांना त्यांच्या सिस्टिममध्ये खरा अभिप्राय मिळेल अशी आशा कंपनीला आहे.