सोनसाखळी चोरांचा बादशाह, बायकोमुळेच पोलिसांच्या ताब्यात

 कल्याणामध्ये  एका कुख्यात सोनसाखळी चोराला पोलिसांनी तब्बल सात वर्षांनी अटक केली आहे

Updated: May 13, 2019, 11:29 PM IST
सोनसाखळी चोरांचा बादशाह, बायकोमुळेच पोलिसांच्या ताब्यात title=

कल्याण : कल्याणामध्ये  एका कुख्यात सोनसाखळी चोराला पोलिसांनी तब्बल सात वर्षांनी अटक केली आहे. या कुख्यात आरोपीवर एक दोन नाही तर तब्बल चार मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. गुलाम मासुम जाफरी नावाचा हा कुख्यात आरोपी त्याच्या पत्नीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. २०१२ पासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गुलाम मासून जाफरी या कुख्यात सोनसाखळी चोरावर एकूण २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे काही महिन्यांपासून त्याने इराणी वस्तीमध्ये एक दुकान उघडून तो चालवत होता .जेव्हा पोलिस इराणी वस्तीवर छापा टाकायचे त्यावेळी गुलाम पळून जायचा .गुलामचे त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी गुलामने आपली पत्नी व सासू ला वेदम मारहान केली होती. 

अखेर बायकोसोबत झालेल्या भांडणामुळे त्याला जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे. कारण बायकोने त्याची टीप पोलिसांना दिली आणि पोलिसांनी त्याला सापळा रचत अटक केली.