महापाप! मंदिरात पुजारी असणाऱ्या वडिलांवर मुलाचा जीवघेणा अत्याचार; देवही माफ करणार नाही

मंदिरात  पुजारी असणाऱ्या एका वृद्धासह त्याच्या मुलाने भयानक कृत्य केले आहे. पुजारी म्हणून देवाची सेवा करणाऱ्या पित्याला मुलाने थेट देवाघरी पाठवले. तपासात त्याच्या या कृत्यामागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे.   

वनिता कांबळे | Updated: May 16, 2023, 08:48 PM IST
महापाप! मंदिरात पुजारी असणाऱ्या वडिलांवर मुलाचा जीवघेणा अत्याचार; देवही माफ करणार नाही

Washim Crime News  : मंदिरात पुजारी असणाऱ्या वडिलांवर मुलाचा जीवघेणा अत्याचार केला आहे. यात या पित्याच्या मृत्यू झाला आहे. वाशिममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या मुलाने आपल्या वडिलांची हत्या का केली यामागे पोलिस तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे. देवाची सेवा करणाऱ्या पुजाऱ्यासह त्याच्या मुलानेच महापापी कृत्य केले आहे. 

हत्ये मागे धक्कादायक कारण?

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपळखेड भगवान बाबा संस्थान येथे ही घटना घडली आहे.आत्माराम धोंडू मुंढे (वय 70 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुंढे यांच्या मुलानेच त्यांची धारदार शस्त्राने वार करुन  हत्या केली आहे.  मुंढे हे भगवान बाबा मंदिरात पुजारी होते. त्यांचा मुलगा संजय मुढे हा पित्याकडे सातत्याने पैसे मागत होता. मात्र, मुंडे यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याच्या रागात मुलाने धारदार शस्त्राचा वापर करून हत्या केली आहे.आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील अधिक तपास रिसोड पोलीस करीत आहेत.

खास यासाठी दिल्लीहून मुंबईत यायचे

दिल्लीहून येऊन मुंबई आणि आसपासच्या परिसरात घरपोळ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना विक्रोळी पोलिसांनी गजाआड केले आहे. लतीफ खान, फर्मान अन्सारी, शमीम अन्सारी असं या त्रिकुटाचं नाव असून हे दिल्ली उत्तर प्रदेश रामपूर परिसरात राहणारे आहे. काही दिवसांपूर्वी विक्रोळीतील एका वृद्ध दांपत्याच्या घरामध्ये घरात कोणी नसताना या त्रिकूटाने घरफोडी करून चार लाख 13 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. यासंदर्भात विक्रोळी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि गुप्त माहितीदारांच्या आधारे पोलिसांनी या त्रिकुटाला बेड्या ठोकल्या. या चोरट्यांनी याआधी नवी मुंबई मध्ये देखील अशाच प्रकारे घरफोडी केली होती.

जून्या वादातून दोन गटात हाणामारी आणि दगडफेक

जुन्या वादातून दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली. यात चार जण जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही घटना घडली. वाळकी येथे मागच्या महिन्यात महापुरुषाची जयंती साजरी करण्यात आली होती. त्यावेळी दोन गटात वाद झाला होता. काल रात्री गावात लाईट गेल्याने काही जण पुतळा परिसरात बसले होते. तिथे दुसऱ्या गटाचे काही तरूण आले. पुन्हा जून्या घटने वरुन दोन गटात वाद झाला. त्यातुन हाणामारी आणि दगडफेक झाली . सद्या गावात तणावपुर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x