भटक्या कुत्र्यांचा लहानग्यावर हल्ला, तोडले शरीराचे लचके

या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर महाळुंगे येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

Updated: Aug 30, 2018, 08:07 PM IST
भटक्या कुत्र्यांचा लहानग्यावर हल्ला, तोडले शरीराचे लचके title=

पुणे: चाकणच्या आंबेठाण परिसरात एका चार वर्षाच्या मुलावर भटक्‍या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

गणेश लांडगे असे या चार वर्षीय मुलाचे नाव असून त्याच्या हाताचे-पायाचे डोक्याचे लचके तोडले आहेत. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर महाळुंगे येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

आंबेठाण परिसरात भटक्‍या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून रात्री–अपरात्री फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे ही अत्यंत जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.