पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

कोकण आणि मुंबईतही २६ ते २८ मार्चदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 25, 2020, 04:18 PM IST
पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी title=

पुणे: कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच पुण्यात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांत विजांचा कडकडाटासह पाऊस बरसला. काल मध्यरात्रीनंतरही पुण्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. यानंतर आज सकाळी आकाश निरभ्र होते. मात्र, दुपारच्या सुमारास वातावरणाचा नूर अचानक पालटला. यानंतर अनेक भागांमध्ये पाऊस झाला. 

राज्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

पुणे वेधशाळेने राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली होती. कोकण आणि मुंबईतही २६ ते २८ मार्चदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जालन्याच्या वडीग्रोदी परिसरातही बुधवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचं नुकसान

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे कापूस, तूर, हरभरा या पिकांसह रब्बीतील चणा, गहू, कांदा यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.