पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे; पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर

पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे असून पावसाचा जोर कायम राहिला तर आज दुपार पर्यत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 15, 2022, 07:53 AM IST
पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे; पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर title=

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची वाटचाल धीम्या गतीने इशारा पातळीकडे सुरू आहे. सद्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 37 फूट 7 इच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून 43 फूट ही धोका पातळी आहे. जिल्ह्यातील एकूण 63 बंधारे पाण्याखाली गेले असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी तुडूंब भरून वाहत असून नदीचे पाणी सध्या कोल्हापूर शहरातील गायकवाड वाड्याजवळ पोहचले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर दुपारी 12 पर्यत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडेल अशी शक्यता आहे.

पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली तर पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरू होईल. पंचगंगा नदीची धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे.