मुंबई : असं म्हणतात की प्रेमात लोक आंधळे होतात. म्हणजेच समोर सगळी परिस्थिती माहिती असूनही पुढील धोके ओळखू शकत नाही आणि नात्यात कायमची कटुता येते. त्यामुळे कोणतीही रिलेशनशिप सुरु कऱण्यासाठी स्वत:ला हे ५ प्रश्न विचारा
१. कोणत्याही दोन व्यक्तींचे विचार एक असू शकत नाहीत. मात्र जीवनात असे काही निर्णय असतात उदाहरणार्थ कुटुंब, शिक्षण, पैसासारख्या निर्णयांमध्ये तुमचे विचार एकसारखे आहेत क? जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊ शकता
२. तुम्ही एकमेकांचा मान ठेवता का? नात्यात जर एकमेकांप्रती सन्मान नसेल तर ते नाते अधिक काळ टिकू शकत नाही.
३. नात्यात एकाने रुसणे, दुसऱ्या रुसवा दूर करणे या गोष्टी चालतातच. मात्र एकमेकांसोबत तुम्ही किती खुश असता हे पाहणेही जरुरीचे असते. तुम्ही एकमेकांच्या सहवासात खुश असता का? याचे उत्तर हो असेल तर नात्यात पुढे जा.
४. जर तुम्ही लग्नबंधनात अडकण्याचा विचार करताय तर एकमेकांच्या कुटुंबाला जाणून घेणेही तितकेच गरजेचे असते. कारण लग्न केवळ दोघांचे नसते तर त्यामुळे दोन कुटुंबे जोडली जातात. त्यामुळे याचाही विचार करणे तितकेचे गरजेचे आहे.
५. तुम्ही जसे आहात तसे समोरच्याला आवडणे अपेक्षित असते. तुमच्या सवयींमुळे नात्यात जर कटुता येत असेल तर त्यावर वेळीच तो़डगा काढणे जरुरीचे असते.