मातांनो, स्तनपानात लाज कसली?

एक ऑगस्ट.... एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा सप्ताह दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजांच्या काळातली हिरकणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची... तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी ती कासावीस झाली आणि अख्खा रायगड उतरुन आडवाटेनं खाली आली. भारतीय समाजात स्तनपानाचं महत्त्व हे पूर्वीपासूनच सांगितलं जातं. पण, बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेतही झाला.

Updated: Aug 1, 2017, 09:47 PM IST
मातांनो, स्तनपानात लाज कसली?

मुंबई : एक ऑगस्ट.... एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा सप्ताह दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजांच्या काळातली हिरकणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची... तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी ती कासावीस झाली आणि अख्खा रायगड उतरुन आडवाटेनं खाली आली. भारतीय समाजात स्तनपानाचं महत्त्व हे पूर्वीपासूनच सांगितलं जातं. पण, बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेतही झाला.

स्तनपान... अमृतपान!

खरं तर पुढची पिढी ही मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आईच्या दूधाला असामान्य महत्व आहे. बाळ दीड वर्षाचं होईपर्यंत स्तनपान केलंच पाहिजे. जागतिक स्तरावरही याबाबत विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ‘वाबा’ (WABA- वर्ल्ड अलायन्स ऑफ ब्रेस्ट फीडिंग अ‍ॅक्शन) सारख्या संस्था मोलाचं काम करत आहेत.

भारतात नोकरदार स्त्रियांचं प्रमाण वाढू लागल्यानं स्तनदा मातांसमोर अनेक प्रश्नही असतात. मात्र, सरकारी पातळीवरील हिरकणी किंवा अनेक कॉर्पोरेट ऑफीसेसमध्ये मिळणारी 'लॅक्टेशन लिव्ह' यांसारख्या विशेष सवलती मिळू लागल्या आहेत. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हे आशादायक चित्र निर्माण झालंय.

स्तनपानाबद्दल हल्लीच्या तरुणींमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. मात्र तज्ज्ञांकडून त्याबाबत वेळीच मार्गदर्शन घेतल्याने आई - बाळाचं नात दृढ होण्यसाठी आणखी मदत होते. बाळाचं स्तनपान हे केवळ एक कर्तव्य म्हणून न पाहता, एक सुदृढ पिढी घडवण्यात आपला मोलाचा वाटा आहे हे नवमातांनी लक्षात घ्यायला हवं... 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x