एक्यूप्रेशरच्या मदतीने पीरियड्सच्या क्रॅम्सपासून खरंच आराम मिळतो का?

पीरियड्स क्रॅम्सच्या वेळी अनेक महिला घरगुती उपायांनी आराम मिळवण्याचा प्रयत्न करतात.

Updated: Apr 8, 2022, 12:39 PM IST
एक्यूप्रेशरच्या मदतीने पीरियड्सच्या क्रॅम्सपासून खरंच आराम मिळतो का? title=

मुंबई : पीरियड क्रॅम्प्सचा तुम्हाला त्रास होतो का?अशा वेळी अनेक महिला घरगुती उपायांनी आराम मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये गरम पाण्याने आंघोळ, जास्त पाणी पिणं इ. गोष्टींचा वापर केला जातो. मात्र तुम्ही कधी एक्यूप्रेशरचा वापर करून पाहिलाय का. तुम्हाला हे विचित्र वाटेल, परंतु यामुळे तुमचे पीरियड्स क्रॅम्प बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात.

एक्यूप्रेशर म्हणजे नेमकं काय?

एक्यूप्रेशर एक पूर्ण सायन्स आहे. शिवाय कोणत्याही परिस्थितीत आराम मिळतो. हे एक्यूप्रेशरने सिद्ध करून दाखवलं आहे. पीरियड्स क्रॅम्समध्ये देखील याचा फायदा होतो. हे पारंपारिक चिनी औषधातून मिळालेलं जुनं तंत्र आहे. असं मानलं जातं की, शरीरावर काही सौम्य बिंदूंवर दबाव आणल्याने वेदना कमी होते. 

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी सकारात्मक परिणामांमुळे डॉक्टर महिलांना सेल्फ-अॅक्युप्रेशरची शिफारस देखील करतात.

एक्यूप्रेशर खरचं आहे का फायदेशीर?

मासिक पाळीच्या वेदनांना प्रत्येक महिलेला तोंड द्यावं लागतं. फर्टिलिटी एक्सपर्ट आणि अभ्यासांचा असा विश्वास आहे की, सुमारे 50 ते 90 टक्के तरुण मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान तीव्र वेदना होतात. कधीकधी, हे इतकं गंभीर असतं की, काही स्त्रियांना पोटदुखी, पाठदुखी आणि अतिसार या तक्रारीही उद्भवतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात थकवा जाणवतो आणि त्यांना नीट काम करता येत नाही. 

अभ्यासात असे आढळून आले आहे की, एक्यूपंक्चरचा उपचार म्हणून वापरल्यास पीएमएस आणि क्रॅम्प्सची तीव्रता कमी होण्यास मदत होते. एक्यूप्रेशर नंतर 2 तासांपर्यंत क्रॅम्सचा त्रास कमी करण्यास मदत होते.

कसं कराल एक्यूपंक्चर

  • तुमच्या अंगठ्याच्या खालील बाजूस 
  • तुमच्या तर्जनीच्या खालील बाजूला

तुम्हाला फक्त हे फॉईंट्स एक-एक करून दाबावे लागतील. काही सेकंद थांबा आणि दुसऱ्या पॉईंटवर जा.