मुंबई : फीटनेस जपण्यासाठी स्विमिंग हा एक उत्तम पर्याय मानला जातो. जीम, डाएट किंवा रोज एकसारखा व्यायाम करणार्या व्यक्तींनी कधीतरी स्विमिंगचा पर्याय देखील स्विकारावा. मात्र मासिक पाळीच्या दिवशी मुलींना स्विमिंग करताना अडचण येऊ शकते. मासिकपाळीच्या दिवसात स्विमिंग करावं का हा प्रश्न अनेक मुलींच्या मनात असतो.
मासिक पाळीच्या काळात स्विमिंग करणं त्रासदायक ठरू शकतं का असा प्रश्न मुलींना असतो. मासिकपाळीचे रक्त पाण्यात मिसळल्यास इतरांना इंन्फेक्शन पसरेल का, असंही अनेकींच्या मनात येतं. तर अशाच प्रश्नांची उत्तर
मासिक पाळीच्या दिवसात स्विमिंग करणं अनहायजेनिक किंवा अस्वच्छ असतं असं नाही. Tampon किंवा मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर केल्याने स्विमिंग दरम्यान रक्त पाण्यात मिसळणार नाही. स्विमिंग करतानाही मासिकपाळी आल्यास फारच कमी रक्तस्राव होतो. पाण्यामध्ये क्लोरिन मिसळलेलं असतं. ज्यामुळे आजार पसरण्याचा धोका आटोक्यात आणला जातो.
स्विमिंग करत असताना पाण्याचा दाब तात्पुरता रक्ताचा स्त्राव कमी करतो. मात्र अशा वेळी हसल्यास किंवा खोकल्यास तसंच शिंकल्यामुळे थोडा फार रक्तप्रवाह होऊ शकतो. पण खरं पाहता हा रक्तस्त्राव दिसतही नाही.
पाण्यातून बाहेर आल्यानंतर रक्तस्त्राव पुन्हा सुरळीत होतो. पण मासिकपाळीच्या काळात Tampon किंवा मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर करा. सॅनिटरी नॅपकिन्स पाणी शोषून घेतात.