मुंबई : पीरियड्सच्या काळात आजकाल अनेक महिला मेंस्ट्रुअल कप वापरतात. मासिक पाळीचे कप हे सुरक्षित आणि टिकाऊ आहेत ज्यांचा वापर मासिक पाळीच्या वेळी योनीमार्गाच्या आतील बाजूस केला जातो. मासिक पाळीचा कप वर्षानुवर्षे टिकू शकतो, ज्यामुळे ते किफायतशीरही आहे. मात्र अजूनही महिलांच्या मनात याबाबत अनेक गैरसमज दिसून येतात. तर आज जाणून घेऊया हे समज किती खरे आहेत.
प्रत्येक वेळी लघवी करण्यासाठी किवा वॉशरूमचा वापर करताना मेंस्ट्रुअल कप काढण्याची गरज नाही. रक्तासोबत तुमची लघुशंका एकत्र नाही होणार. इतकंच करा की, थोडं पुढे वाकून लघुशंका करा. काही लोकांना वॉशरूम वापरताना मेंस्ट्रुअल कप काढून टाकणं सोयीस्कर असतं.
मासिक पाळीचा फ्लो कमी किंवा जास्त असला तरी काही फरक पडत नाही. योग्य आकाराचा मेंस्ट्रुअल कप फ्लो योग्य रितीने सांभाळू शकतो. ज्याप्रमाणे टॅम्पोन्स आणि सॅनिटरी नॅपकिन्स हेवी फ्लो दरम्यान काही अंतराने बदलणं आवश्यक आहे, त्याच परिस्थितीत मेंस्ट्रुअल कप नियमित अंतराने रिकामी करणं आवश्यक आहे.
मेंस्ट्रुअल कपकपचा वर्जिनिटी गमावण्याशी काहीही संबंध नाही. वर्जिनिटी गमावणं म्हणजं एखाद्याशी लैंगिक संबंध ठेवणं. नियमित मासिक पाळीसाठी मेंस्ट्रुअल कप वापरणं म्हणजे सेक्स करणं असं होत नाही. मासिक पाळीच्या कपच्या वापरामुळे हायमेनवर परिणाम होतो या गोष्टीमुळे हा गैरसमज महिलांच्या मनात आहे.